मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्री तिची वेबसिरीज रानबाजारमुळे चर्चेत आहे. ही चर्चा संपता संपत नाही. तर प्राजक्ता पुन्हा एकदा एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आणि याचं कारण आहे ते म्हणजे, तिने शेअर केलेला तिचा फोन नंबर. आता तिने असं का केलं हा प्रश्न सगळ्यांना पडल्याचाही पाहायला मिळत आहे. नुकतीच प्राजक्ताची मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार प्रदर्शित झाली.
सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. अवघ्या काही वेळातच या वेबसिरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.या वेबसिरीजमध्ये प्राजक्ता माळीसह तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येताच . या सिरीजने धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे या वेबसिरीजच्या प्राजक्ता माळीच्या टीझर वर युजर्स तुटून पडले होते. प्राजक्ता माळीच्या बोल्ड सीनवर चाहते तीव्र प्रतिक्रीया देत आहेत.
आत्तापर्यंत या सिरीजचे पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या पाचही भागाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. या वेबसिरीजच्या चर्चेमध्ये प्राजक्ताने मोबाईल नंबर का शेअर केला असा प्रश्न विचारला जात आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, प्राजक्ताने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला फोन नंबर तिचा नाहीये.
हे एक मीम्स आहे जे प्राजक्ताने शेअर केलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, प्राजक्ताने वेबसिरीज मधला सीन शेअर केला आहे. ज्यात प्राजक्ता तेजस्विनीला नंबर सांगताना दिसतेय. या व्हिडिओवर लिहीण्यात आलं आहे की, सतत कोण ना कोण विचारत असतं. प्राजूचा फोन नंबर आहे का म्हणून, घ्या आता... हा व्हिडिओ पाहून चाहते हैराण होतील हे मात्र नक्की. अवघ्या काही वेळातच प्राजक्ताची ही पोस्ट व्हायरल होत आहे.