PHOTO : अश्विनीचा ग्लॅमरस अवतार, उत्सुकता वाढली

नुकतंच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावेने एक फोटो शूट केलं आणि त्यातला एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Updated: Sep 6, 2017, 05:47 PM IST
PHOTO : अश्विनीचा ग्लॅमरस अवतार, उत्सुकता वाढली title=

मुंबई : नुकतंच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावेने एक फोटो शूट केलं आणि त्यातला एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

तिच्या या फोटोला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाददेखील मिळत आहे. फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

तिने परिधान केलेला लाल कलरचा गाऊन तिच्या सौंदर्यामुळे अजूनच खुलून येत आहे. पण, अश्विनीनं हा फोटो सहजच शेअर केलाय की आणखी काही? तिच्या या ग्लॅमरस फोटो टाकण्यामागे कारण काय? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण तिचा असा फोटो पाहून सर्वच सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्याही भुवया उंचावल्या आहेत हे नक्की... 

अश्विनीच्या नवीन चित्रपटाचा हा टीझर आहे की काय? की आणखी काही? असे बरेच प्रश्न तिचा हा ग्लॅमरस फोटो पाहून प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उभे राहिलेत. शिवाय अश्विनीनं आपला फोटो शेअर करताना #StayTuned हा हॅशटॅगही वापरलाय, त्यामुळे ही उत्सुकता आणखी वाढलीय.