व्हिडिओ पाहून व्हाल थक्क; छायाचित्रकारांना पाहताच खिलाडी कुमारने.....

अभिनेता अक्षय कुमार याने कायमच...

Updated: Jan 29, 2020, 11:06 AM IST
व्हिडिओ पाहून व्हाल थक्क; छायाचित्रकारांना पाहताच खिलाडी कुमारने..... title=
अक्षय कुमार

मुंबई : अभिनयासोबतच साहसी कृत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार याने नव्या जोमाच्या कलाकारांसाठी काही मैलाचे दगड प्रस्थापित केले आहेत. एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणूनही तो कायमच अनेकांचा आदर्श ठरला आहे. असा अक्षय कुमार हा माध्यमांसोबतचं त्याचं नातही अगदी खास पद्धतीने जपत असतो. अगदी मित्राप्रमाणे त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणं असो किंवा, त्यांच्याशी थोडी थट्टा मस्करी करणं असो. 

सोशल मीडियावर याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जे पाहता अरेsssss हा करतोय तरी काय? असाच प्रश्न चाहत्यांनाही पडत आहे. चित्रीकरणावरुन परतत असतानाच्या या व्हिडिओमध्ये अक्षयभोवती छायाचित्रकारांनी घोळका केला. 

एक झलक टीपण्यासाठी म्हणून छायाचित्रकारांच्या घोळक्यातही अगदी शांतपणे चालणाऱ्या अक्षयने अचानक तेथून आपण पळ काढत असल्याचं भासवत काही पावलं तो अक्षरश: वेगाने धावला. उपस्थितांना चकवून जाण्याचा त्याचा हा खोडकर अंदाज पाहता त्यावेळी तेथे अनेकांना हसू आवरलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जेव्हा अनेकांनी पाहिला तेव्हा त्यावर काही धमाल कमेंट्स करत खिलाडी कुमारचीच चर्चा पुन्हा झाल्याचं पाहायला मिळालं. 

VIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज

अक्षय कुमारच्या चित्रपटांविषयी सांगावं तर, नुकताच त्याने 'बच्चन पांडे' या आगामी चित्रपटाचा नव पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या 'लाल सिंग च़ड्ढा' या चित्रपटासाठी मित्रत्वाच्या नात्याने अक्षयने त्याच्या बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. ज्या कारणास्तव आमिरने थेट सोशल मीडियावरुन अक्षयचे आभारही मानले.