शाहरुख खानच्या लेकीला मिस्ट्री बॉयच्या मिठीत पाहून चाहते हैराण; फोटो व्हायरल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

Updated: Dec 14, 2022, 05:52 PM IST
शाहरुख खानच्या लेकीला मिस्ट्री बॉयच्या मिठीत पाहून चाहते हैराण; फोटो व्हायरल title=

Suhana Khan Party Photos: अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान ( Shahrukh Khan Daughter Suhana Khan ) जरी सिनेमांपासून दूर असली तरीही आपल्या स्टाइल आणि लुक्ससाठी लोकप्रिय आहे. सुहाना खान बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सच्या तुलनेत अधिक चर्चेत असते. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय राहते. नेहमी स्वत:च्या फोटोमुळे चर्चेत असणारी सुहाना यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी सुहानाचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ते पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित होत आहेत. 

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुहाना तिचे एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशा परिस्थितीत आता सुहाना खानचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे आणि तिच्यासोबत तिची एक मैत्रिणही दिसत आहे.

फोटो पाहून असं वाटत आहे की, हा सुहानाचा खूप जवळचा मित्र आहे. या फोटोत सुहानाने ब्लू क्रॉप टॉप आणि ब्लू पँन्ट घातल्याचं दिसत आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान या दिवसांत न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण घेत आहे.

काहि दिवसांआधी सुहानाने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती तिच्या मित्रासोबत दिसत आहे. मात्र या फोटोची सर्वात जास्त चर्चा फोटोत दिसणाऱ्या मुलाची आहे. सुहानाने ज्याप्रकारे या मिस्ट्रीबॉयसोबत पोज दिली आहे त्यामुळे सुहानाच्या या मिस्ट्रीबॉयची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

सुहाना लवकरचं 'द आर्चीज’ (The Archies) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.  सिनेमा पूर्णपणे मैत्रीवर आधारित असून अनेक नवीन चेहेरे समोर येणार आहेत. (suhana khan movie)

सिनेमात सुहाना शिवाय सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू  अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘द आर्चीज’ मध्ये अगस्त्य नंदा - आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर - बेट्टी कपूर आणि सुहाना खान - वेरोनिका लोज म्हणून झळकणार आहेत. (suhana khan dance)

स्टारकिड्सच्या पहिल्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शिका झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज’सिनेमा (suhana khan netflix) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा नक्की कधी प्रदर्शित होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.