मानस या अपघातातून बचावेल का?

वैदेहीचं प्रेम पणाला 

मुंबई : 'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत अल्पावधीतच मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी झी युवा या वाहिनी प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन त्यांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे. कॉलेजमधील निरागस प्रेम प्रेक्षकांसमोर आणणारीफुलपाखरू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि त्यातील प्रमुख भूमिकेतील मानस आणि वैदेही ही पात्र तर त्यांच्या मनात घर करून बसली आहेत. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी मानस आणि वैदेहीच्या लग्नाचा सोहळापाहिला. दोन प्रेमी जीव एकत्र आले आणि आता त्यांच्या नव्या नात्याचा खरा प्रवास सुरु झाला आहे. पण त्यांच्या या प्रवासात ते अनेक अडथळ्यांना सामोरे जात आहेत.

सध्या मालिकेत प्रेक्षक मानस आणि वैदेहीचा नव्या संसाराचा प्रवास पाहत आहेत. लग्नानंतर मानस पुन्हा ऑफिसला रुजू झाला आहे. दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे मानस घरी आल्यावरच वैदेहीला वेळ देऊ शकत आहे.कुलदीपने मानस आणि वैदेहीच्या लग्नात देखील अनेक प्रॉब्लेम्स निर्माण केले आणि आता देखील त्याच्या मनात त्या दोघांविषयी कपट आहे. त्याच्या एकंदरीत वागण्याचा वैदेहीला संशय येतोय. कुलदीप मानसला उध्वस्त करण्याच्यामागे आहे. एकेदिवशी मानस वैदेहीशी फोनवर बोलत असताना त्याला अचानक एक ट्रक उडवतो आणि मानसचा अपघात होतो.

हा अपघात मानसला जीवे मारण्यासाठी करण्यात आला आहे का? कुलदीप या सगळ्याच्या मागे तर नसेल ना? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका फुलपाखरू सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त झी युवावर