प्रसिद्ध अभिनेत्रीवर झाला लैंगिक अत्याचार; स्वत:च गौप्यस्फोट केल्यानं उडाली खळबळ

अभिनेत्रीनं तिच्या जीवनावर आधारित एका डॉक्युमेंट्रीतून सिक्रेट्स ओपन केले आहेत. अभिनेत्रीनी तिच्यावर बेतलेली आपबिती सांगिल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Updated: Jan 23, 2023, 12:25 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीवर झाला लैंगिक अत्याचार; स्वत:च गौप्यस्फोट केल्यानं उडाली खळबळ

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि हॉलिवूड अभिनेत्री ब्रूक शील्डसने तिच्या जीवनावर आधारित बनलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये असे सिक्रेट्स ओपन केले आहेत. जे ऐकून कोणीही हैराण होईल. मात्र ब्रूकने वयाच्या 11 व्या वर्षापासून हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि द ब्लू लगून (1980) द्वारे जगभरात प्रसिद्धी मिळवली. प्रीटी बेबी: ब्रूक शील्ड्स ही दोन भागांची डॉक्यूमेंन्ट्री आहे. ब्रूक शील्ड्स तिच्या डॉक्यूमेंन्ट्रीच्या प्रीमियरनंतर पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ही डॉक्यूमेंन्ट्री नुकतीच सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाली. ही डॉक्युमेंट्री यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म हुलुलुवर प्रदर्शित होणार आहे.

तो तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला...
57 वर्षांच्या ब्रूक शील्ड्सने सांगितलं की, बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर, जेव्हा ती मोठी झाली आणि तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं, तेव्हा तिने पुन्हा चित्रपटांमध्ये काम शोधण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिची एक जुनी ओळखीची व्यक्ती भेटली. आणि तो तिला त्याच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. त्याने हॉटेलमधून तिच्यासाठी टॅक्सी मागवणार असल्याचं सांगितलं.

हॉटेलच्या खोलीत पोहोचल्यानंतर तो माणूस बाथरूममध्ये गेला आणि बराच वेळानंतर परत आला. यावेळी त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो माझ्यावर तुटून पडला. मला वाटलं की तो माझ्याशी कुस्ती खेळत आहे... माझा गुदमरत होता. मी त्याच्याशी लढू शकले नाही. ईथून कसं तरी जगावं आणि इथून निघून जावं असं मला वाटत होतं.

शील्ड्सने डॉक्युमेंट्रीमध्ये ती पुढे म्हणाली की, 'जेव्हा मी तिथून बाहेर पडले आणि हॉटेलमध्ये काय घडलं ते सांगण्यासाठी माझ्या मित्राला फोन केला, तेव्हा त्याने मा सांगितलं की, त्याने तुझ्यावर बलात्कार केला आहे. मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नव्हता. आणि हेच कारण होतं की, मी इतकी वर्षे गप्प का राहिले. या घटनेबाबत मी कोणाशीही बोलले नाही.

मात्र ब्रूक शील्ड्सने डॉक्यूमेंट्रीमध्ये हे सांगितलं नाही की, त्याच्या ओळखीची व्यक्ती कोण आहे, त्याचं नाव काय आहे, त्याच्यावर कोणी बलात्कार केला आहे. ब्रुक शील्ड्सच्या या खुलाशामुळे अमेरिकेसह जगभरात पसरलेले तिचे चाहते हादरले आहेत. एकेकाळी जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ब्रूक शील्ड्सने 1997 मध्ये अमेरिकन टेनिस स्टार आंद्रे अगासीशी लग्न केलं. पण ते दोन वर्षेही एकत्र राहिले नाहीत आणि 1999 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.