'या' हिंदू देवाच्या प्रेरणेमुळे जॅक स्पॅरोचे पात्र रेखाटले

या पात्राच्या निर्मितीमागे भारतीय कनेक्शन असल्याचा खुलासा नुकताच या चित्रपटाच्या एका लेखकाकडून करण्यात आला. 

Updated: Sep 29, 2018, 04:51 PM IST
'या' हिंदू देवाच्या प्रेरणेमुळे जॅक स्पॅरोचे पात्र रेखाटले title=

मुंबई: हॉलिवूडचा 'पायरेटस ऑफ कॅरेबियन' या प्रसिद्ध चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. यापैकी कॅप्टन जॅक स्पॅरोचे मजेशीर पात्र अनेकांना भावले होते. जॅक स्पॅरो हे पात्र 'पायरेटस ऑफ कॅरेबियन' चित्रपटाची जान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, या पात्राच्या निर्मितीमागे भारतीय कनेक्शन असल्याचा खुलासा नुकताच या चित्रपटाच्या एका लेखकाकडून करण्यात आला. 

टेड एलिओट हे 'पायरेटस ऑफ कॅरेबियन'च्या पटकथाकारांपैकी एक होते. त्यांनी नुकताच जॅक स्पॅरोच्या पात्रासंदर्भात एक महत्वपूर्ण खुलासा केला.  मात्र, हे पात्र श्रीकृष्णाच्या व्यक्तीमत्वापासून प्रेरणा घेऊन रेखाटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

जॅक स्पॅरोचे पात्र लिहत असताना आम्ही श्रीकृष्णाचे व्यक्तीमत्व डोळ्यांसमोर ठेवले होते. त्यासाठी श्रीकृष्णाच्या व्यक्तीमत्वाचा आणि स्वभावाच्या विविध पैलुंचा आम्ही अभ्यासही केला. या सगळ्यातून जॅक स्पॅरोच्या अजराअमर पात्राने आकार घेतला, असे टेड एलिओट यांनी सांगितले.