पंतप्रधान मोदी राकेश रोशन यांना म्हणाले 'फायटर'

पाहा काय म्हणाले मोदी 

पंतप्रधान मोदी राकेश रोशन यांना म्हणाले 'फायटर' title=

मुंबई : हृतिक रोशनने नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून वडील राकेश रोशन यांना कॅन्सर झाल्याचं सांगितलं आहे. हृतिकने राकेश रोशन यांच्यासोबतचा जिममधील एक फोटो देखील शेअर केला असून त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. सोबत हे देखील सांगितलं की, सर्जरीच्या दिवशी देखील त्यांनी जिम टाळली नाही. 

ही बातमी अगदी थोड्यावेळातच वायरल झाली. आणि बॉलिवूड कलाकार, चाहत्यांनी सगळ्यांनीच राकेश रोशन यांच्या चांगल्या आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. 

डिअर हृतिक, श्री राकेश रोशन यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. ते फायटर आहेत. मला विश्वास आहे, ते या प्रसंगाला अगदी धाडसाने सामोरे जातील. 

याला उत्तर म्हणून हृतिकने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्याने म्हटलं की,'थँक्यू सर, तुमच्या शुभेच्छांकरता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांची तब्बेत उत्तम आहे.'प्राथमिक स्तरातील squamous cell carcinomaशी ते झुंज देत आहेत', असं लिहित काही आठवड्यांपूर्वीच त्यांना या आजाराचं निदान झाल्याचं हृतिकने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.  

डिलांनाच आपल्या कुटुंबाचा आधार म्हणत असा खंबीर आणि धीट आधार असणं हे आमचं भाग्यच असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हृतिकने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये राकेश रोशन आणि तो असे दोघंही जीममध्ये दिसत असून, त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे आजारपणातही हृतिकच्या वडिलांची लढाऊ वृत्ती ही खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देत आहे, असं म्हणायला हरकत नाही.