अंधेरीतल्या बंगल्यातून लाईव्ह पॉर्न दाखवत होत्या 2 अभिनेत्री, 1 अभिनेता; अचानक पोलिसांची धाड…

अंधेरी, मुंबई येथील दोन अभिनेत्री आणि एका अभिनेत्याला एका एडल्ट फिल्मचं शूटिंग करताना आणि त्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग करताना अटक करण्यात आली आहे. 

Updated: Nov 8, 2023, 02:39 PM IST
अंधेरीतल्या बंगल्यातून लाईव्ह पॉर्न दाखवत होत्या 2 अभिनेत्री, 1 अभिनेता; अचानक पोलिसांची धाड… title=
(Photo Credit : File Photo)

मुंबई : अंधेरी, मुंबई येथील दोन अभिनेत्री आणि एका अभिनेत्याला एका एडल्ट फिल्मचं शूटिंग करताना आणि त्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग करताना अटक करण्यात आली आहे. या एडल्ट फिल्मचे लाईव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन आधारित एप 'पिहू' वर केलं जात होतं. मात्र आता हे एप प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आलं आहे.

याप्रकरणी रविवारी तिघांना अटक करण्यात आली.  'पिहू' या सबस्क्रिप्शनवर आधारित एपवर या अश्लिल चित्रपटाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. हे यूके स्थित ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मसारखं आहे, जिथे मुलं आणि मुली अश्लील चित्रपट तयार करतात. ईथे युजर्स मासिक आधारावर खाजगी सामग्रीसाठी पैसे देतात.

पोलिसांना माहीतगाराकडून एडल्ट फिल्म बनवल्याची खबर मिळाली होती.
एचटीने वर्सोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सांगितलं की, अटक केलेल्यांमध्ये दोन महिला (20 आणि 34 वर्षे) आणि एका 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे जे अॅपवर त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ पोस्ट करत होते.

अंधरी पश्चिम येथे छापा टाकून आरोपींना रंगेहात पकडलं
पोलिसांनी सांगितलं की, एका आठवड्यापूर्वी त्यांना या अॅपवर अशा आक्षेपार्ह व्हिडीओचे शूटिंग आणि लाइव्ह स्ट्रिमिंगची माहिती एका स्थानिक गुप्तचराकडून मिळाली होती. तेव्हापासून पोलीस  अंधेरीतील चार बंगल्यांवर छापा टाकण्याच्या तयारीत होते. रविवारी पोलीस अधिकाऱ्यांनी अंधरी पश्चिम येथे छापा टाकला आणि आरोपींना रंगेहाथ पकडलं.

घटनास्थळी तीन जण सापडले, त्यांना अटक करण्यात आली आहे. हे तिघंही कलाकार होते आणि आता हे एप चालवणाऱ्या या नेटवर्कमागील मास्टरमाइंडचा पोलिस शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. इंस्टाग्रामवर थेट मॅसेजकरुन या एपच्या युजर्सना लाईव्ह स्ट्रीमिंगची माहिती देण्यात येत होती. याशिवाय ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसारख्या सेवाही महिलांनी दिल्या आहेत. यासाठी युजर्सना नोंदणी शुल्कासह 7500 रुपये जमा करायला लागायचे. आणि प्रत्येक सीनसाठी त्यांना एडवान्स पैसे द्यावे लागायचे अशी माहिती आहे.

पोलीस या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहेत
आता हे एप गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवरूनही काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तीन आरोपींविरुद्ध भादंवि कलम २९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.