लग्न न करताच अभिनेता झाला बाबा; पत्नीला सोडून Girlfriend सोबत जगतोय मनमुराद आयुष्य

पाहा कोण आहे हा अभिनेता...

Updated: Sep 29, 2022, 12:55 PM IST
लग्न न करताच अभिनेता झाला बाबा; पत्नीला सोडून Girlfriend सोबत जगतोय मनमुराद आयुष्य title=

मुंबई : बॉलिवूड म्हटलं की गॉसिप आणि अफवा तर असतात, त्याशिवाय बॉलिवूड हे पूर्ण नाही. काही लोक रिलेशनशिपमध्ये येतात तर काहींचा लगेच घटस्फोट होतो. आज आपण अशा एका अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत ज्यानं स्वत: पेक्षा वयानं मोठ्या मॉडेलशी लग्न केलं. हा अभिनेता 20 वर्ष लग्न बंधनात राहिला आणि नंतर स्वत:पेक्षा वयानं15 वर्षानं लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आला. एवढंच नाही तर त्याला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला एक मुलगाही आहे. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal). 

बातमीची लिंक : दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला...

 अर्जुन रामपालनं आपल्या फिल्मी करिअरमध्ये फार कमी चित्रपट केले आहेत आणि निवडक चित्रपट करूनही अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे, पण अर्जुन त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जितका चर्चेत असतो तितका तो त्याच्या करिअरमुळे नसतो. अर्जुनच्या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या लाखोंमध्ये आहे. खरंतर अर्जुन जेव्हा त्याच्या करिअरमध्ये यशस्वी झाला नव्हता तेव्हा त्यानं स्वत: हून वयानं मोठ्या असलेल्या सुपरमॉडल आणि माजी मिस इंडिया मेहर जेसियासोबत लग्न बंधनात अडकला. 

आणखी वाचा : 'मी बारीक झाले तर…', वाढत्या वजनावर वनिता खरातचं वक्तव्य चर्चेत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

अभिनेत्यानं 1998 मध्ये मेहर जेसियाशी लग्न केलं. त्यानंतर अर्जुनला दोनं मुली झाल्या असून त्यांची नावं मायरा आणि माहिका आहे. परंतु त्याचं लग्न हे केवळं 20 वर्षे टिकलं आणि त्यानंतर दोघेही विभक्त झाले. मेहरसोबत घटस्फोट घेतल्याच्या बातम्यांमध्येच अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेल (Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades) गॅब्रिएला डेमेट्रेड्सच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर गॅब्रिएला अर्जुनच्या मुलाची आई झाली, या मुलाचं नाव एरिक आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅब्रिएला आणि अर्जुनचं लग्न झालेले नाही. (Arjun Rampal hand an extra marital affair with model gabriella demetriades and left his wife) 

आणखी वाचा : दाक्षिणात्य विरुद्ध बॉलिवूड चित्रपटावर ऐश्वर्या रायचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली...

गॅब्रिएलासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर अर्जुन क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसला, परंतु तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या इन्स्टाग्रामवर एक नजर टाकली तर लक्षात येईल की अर्जुन त्याच्या मुलांवर किती प्रेम करतो. अर्जुन त्याच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अर्जुन सगळ्यात शेवटी 'धाकड' चित्रपटात दिसला होता, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर अर्जुन 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तो 'नास्तिक' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.