सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, 'या' अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे, बातमी खरी आहे की खोटी अशी चर्चा रंगली होती. पण एका अभिनेत्रीला या लग्नाच निमंत्रण मिळालंय, असं तिने सांगितलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 14, 2024, 01:44 PM IST
सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, 'या' अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका title=

Sonakshi Sinha Wedding : दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) बॉयफ्रेंड जहीर इक्बालसह मुंबईत 23 जूनला लग्न करणार आहे, अशा बातम्या समोर येत आहे. सोनाक्षी सिन्हाचे वडील आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी लग्नाबद्दल पुष्टी दिली नाही. मात्र नुकताच एक अभिनेत्रीने आपल्याला या लग्नाच निमंत्रण मिळालंय, असं सांगितलंय. पूनम ढिल्लन हिने दोघांच्या लग्नाला दुजोरा दिलाय. 

काय म्हणाले पूनम ढिल्लन? 

instantbollywood शी बोलताना पूनम ढिल्लन (Poonam Dhillon) म्हणाली की, 'सोनाक्षी सिन्हा हिला लग्नाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. तिने खूप सुंदर आमंत्रण पत्रिका पाठवली आहे. मी तिला अगदी लहानपणापासून पाहिल आहे. तिचं आतापर्यंतचा प्रवास पाहिला आहे. देव तिला खूप आनंदी ठेवो. ती खूप छान आणि प्रेमळ मुलगी आहे. त्यामुळे माझ्या सर्व शुभेच्छा तिच्या पाठीशी आहे.'

त्यासोबत पूनम यांनी जहीरला इशाराही दिला, की सोनाक्षीला कायम खूष ठेवो, 'ती आमच्यासाठी चांगली मुलगी आणि आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.' असं हसत हसत वराला तंबी दिली आहे. 

हेसुद्धा वाचा - सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

शत्रुघ्न सिन्हा म्हणालेत की...

सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची बातमी आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) म्हणाले की, 'मला अजून तिने काही सांगितलेलं नाही. पण आमचा आशीर्वाद तिच्यासोबत असेल. आजकालचे मुलं आई वडिलांची परवानगी घेत नाही तर त्यांना निमंत्रण देतात. मला माझ्या मुलीवर विश्वास आहे, ती योग्य निर्णय घेईल.'

जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाची भेट ही सलमान खानच्या घरी असलेल्या एका पार्टीत झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम झालं. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या अनेक वर्षांपासून जहीर आणि सोनाक्षी लिव्ह इन रिलेशनशिप राहतात. या दोघांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहिला मिळतात. भारताबाहेर फिरायला गेले आणि नुकताच झालेल्या सोनाक्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेले फोटो जहीरच्या अकाऊंटवर पाहिला मिळतात. 

सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीमुळे सध्या चर्चेत आहे. तर जहीर हा अभिनेता असून सोनाक्षी आणि जहीरने 'डबल एक्सएल' या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.