पॉप स्टार जस्टीन बीबरचं अखेर लग्न ठरलं

कॅनडाचा पॉप स्टार जस्टीन बीबर आणि अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविन यांचं लग्न ठरलंय. 

Updated: Jul 10, 2018, 12:35 PM IST
पॉप स्टार जस्टीन बीबरचं अखेर लग्न ठरलं

न्यू यॉर्क : कॅनडाचा पॉप स्टार जस्टीन बीबर आणि अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविन यांचं लग्न ठरलंय. मनोरंजनच्या बातम्या देणाऱ्या एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, बीबरने बहामाजच्या एका रिसॉर्टमध्ये हेलीला लग्नाचा प्रस्ताव दिला, जो तिने स्वीकारला. सीएनएन आणि एंटरटेनमेंट न्यूजने बीबर-हेलीचं लग्न ठरल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे.

बीबरचे वडील जेरेमी यांनी आपला बीबरचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिलं आहे, येणाऱ्या पुढील क्षणांविषयी मी उत्साही आहे.बीबरची आई पेटिटने ट्विटरवर आपल्या उत्साहपूर्ण भावना लिहितांना, अनेक वेळा 'लव्ह' लिहिलं आहे.

टीएमझेडच्या रिपोर्टनुसार जस्टिन बीबरची मैत्रीण सेलेना गोमेजसोबत त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर, बाल्डविनसोबत त्याची जवळीक वाढली.

हेली बाल्डविन अमरीकन वोग, मेरी क्लेयर आणि स्पॅनिश मासिक हार्पर्स बाजारमध्ये झळकली आहे. याशिवाय ती अनेक टेलिव्हिजन शो, म्यूझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये देखील दिसली आहे.

ती अभिनेता आणि निर्माता स्टीफन बाल्डविन यांची मुलगी आहे, स्टीफन 'द युज़ुअल सस्पेक्ट्स' आणि 'द फ्लिनस्टोंस इन वाइवा रॉक वेगास' सारख्या सिनेमातही तिने काम केलं आहे.

हेली अभिनेता अलेक बाल्डविनची भाची आहे, ती एक प्रसिद्ध कॉमेडी शो सॅटरडे नाईट लाईव्हवर राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांची मिमिक्री केल्यानंतर प्रसिद्धीला आली होती.