'या' प्रसिद्ध पॉर्न स्टारला Shahrukh Khan सोबत करायचंय काम

अ‍ॅडल्ट इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला शाहरूख सोबत चित्रपटात काम करायचंय, ही पॉर्न स्टार आहे तरी कोण? 

Updated: Jun 29, 2022, 08:28 PM IST
'या' प्रसिद्ध पॉर्न स्टारला Shahrukh Khan सोबत करायचंय काम title=

मुंबई : बॉलिवूड़चा बादशाह शाहरूख खानचा जवान हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा पोस्टर पाहून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागलीय. या चित्रपटाची चर्चा सुरु असताना आता पॉर्न स्टार केंड्रा लस्टने शाहरूख सोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.यावर आता शाहरूख काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान ही पॉर्न स्टार आहे तरी कोण हे जाणून घेऊयात. 
 
केंड्रा लस्ट ही एक प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे. तिने शाहरूख सोबत डॉन 3 या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या तिच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकचं खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, केंड्रा ही किंग खानची फॅन असल्याने तिने ही इच्छा व्यक्त केली आहे. 

कोण आहे केंड्रा लस्ट? 

केंड्रा लस्ट हीचे खरे नाव मिशेल अ‍ॅनी मेसन (Michele Anne Mason) आहे. ती एक अमेरिकन पॉर्न अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. केंड्राने नर्सिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. तसेच सात वर्षे तिने परिचारिका म्हणून काम केले होते. केंड्राने तिच्या करिअरची सुरुवात वेबकॅम मॉडेलिंगपासून केली. 2012 मध्ये तिने अॅडल्ड इंडस्ट्रीत प्रवेश केला. केंड्राने अ‍ॅडल्ड इंडस्ट्रीचा लोकप्रिय पुरस्कार XBIZ जिंकला आहे.

प्रोडक्शन हाऊस सुरु

पॉर्न फिल्ममध्ये येण्यापूर्वी केंड्राने तीन महिने वेबकॅम मॉडेलिंग केले. मार्च 2012 मध्ये त्यांनी अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्च 2015 मध्ये, केंड्राने Arch Angel Productions सोबत 1 वर्षाचा करार केला. 2015 मध्ये, केंद्राने टॅलेंट एजन्सी सोसायटी सुरू केली होती. केंड्राने 2016 मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले. ती लस्ट आर्मी प्रोडक्शन नावाने स्वतःची प्रोडक्शन कंपनी चालवते. 

वैयक्तिक आयुष्य

केंड्राच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, तिने एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले आहे. या लग्नातून त्यांना एक मुलगी आहे. तिच्या पतीचे नाव चक मेसन आहे.

'या' अभिनेत्यासोबत नाव चर्चेत
केंड्राचे नाव कुस्तीपटू आणि अभिनेता जॉन सीनासोबतही जोडले गेले होते. दोघांचे अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या.मात्र केंड्रा आणि जॉन सीना यांनी या वृत्तांची पुष्टी केली नाही.