कॅन्सर सर्जरीनंतर राकेश रोशन ऍक्टिव, पहिला फोटो

पाहा फोटो 

कॅन्सर सर्जरीनंतर राकेश रोशन ऍक्टिव, पहिला फोटो

मुंबई : दोन दिवसांअगोदरच अभिनेता हृतिक रोशनने फिल्ममेकर राकेश रोशन यांच्यावर कॅन्सर सर्जरी असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. या बातमीमुळे चाहत्यांना आणि बॉलिवूडकरांना मोठा झटका बसला आहे.राकेश रोशन आणि हृतिक रोशनचे चाहते यासाठी प्रार्थना करत आहेत. सर्जरी झाल्यानंतर राकेश रोशन यांचा फोटो समोर आला आहे. या फोटोत ते अगदी पॉझिटीव दिसत आहेत. 

हृतिक रोशनचा 10 जानेवारी रोजी 45 वा वाढदिवस होता. पण त्याने या दिवशी वाढदिवस साजरा न करता सरळ वडिलांसोबत डॉक्टरांकडे केला. तिथे कुटुंबियांनी वाढदिवसाचं डबल सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशनचं कारण होतं हृतिकचा वाढदिवस आणि ऑपरेशन उत्तम झाल्याचं निमित्त. 

राकेश रोशन या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये अतिशय फ्रेश दिसत आहेत. तुम्हाला वाटेल की, ते कोणत्या बेडवर झोपले आहेत. तर तसं अजिबात नाही. राकेश रोशन या फोटोत ऑपरेशननंतर उत्तम दिसत आहेत. पण राकेश रोशन यांच्या नाकाला नळी लावली आहे. आणि इतर कोणताही त्यांना त्रास होताना दिसत नाही. कुटुंबासोबत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. 

या शेअर केलेल्या फोटोत हृतिक रोशन, राकेश रोशन आई पिंकी रोशन आणि काका राजेश रोशन देखील दिसत आहे. आपल्याला माहितच आहे राकेश रोशन यांच्या उत्तम आरोग्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांची तब्बेत उत्तम आहे.'प्राथमिक स्तरातील squamous cell carcinomaशी ते झुंज देत आहेत', असं लिहित काही आठवड्यांपूर्वीच त्यांना या आजाराचं निदान झाल्याचं हृतिकने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.  

वडिलांनाच आपल्या कुटुंबाचा आधार म्हणत असा खंबीर आणि धीट आधार असणं हे आमचं भाग्यच असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हृतिकने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये राकेश रोशन आणि तो असे दोघंही जीममध्ये दिसत असून, त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे आजारपणातही हृतिकच्या वडिलांची लढाऊ वृत्ती ही