प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 6, 2023, 01:27 PM IST
प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित  title=

Prabhas Salaar Teaser Released: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या 'सालार' (Salaar) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाविषयी सगळ्या अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा आहे. अशात प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली असून आज 6 जुलै रोजी सकाळी 5.12 वाजता 'सालार'चा टीझर प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यातही हा टीझर सकाळी का प्रदर्शित करण्यात आला आणि त्यासोबत त्यात काय असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

'KGF' निर्माते प्रशांत नील यांनी 'सालार' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. प्रेक्षक या टीझरची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. हा टीझर प्रदर्शित होऊन चार तासात त्याला 6.7 मिलियन व्ह्यूस मिळाले आहेत. तर चित्रपटासोबतच प्रदर्शनाची तारिखही समोर आली आहे. हा टीझर 1.47 सेकंदाचा आहे. 'सालार'च्या टीझरची सुरुवात एका व्यक्तीपासून होते. ही व्यक्ती गाडीवर बसलेली असते आणि त्याच्या अवतीभोवती खूप लोक असतात. त्या सगळ्यांच्या हातात रायफल वगैरे असतात. ती व्यक्ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती व्यक्ती आहे टीनू आनंद आहे. टीनू यांचा चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्यावेळी ती व्यक्ती बोलते की सिंपल इंग्लिश, नो कन्फ्यूजन। आई एम चीता, टाइगर, एलिफेंट...वेरी डेंजरस...बट नॉट इन जुरासिक पार्क, क्योंकि उस पार्क में...., त्यानं इतकं बोलताच समोरची व्यक्ती घाबरते. त्यानंतर प्रभास दिसतो. त्याच्या हातात चाकू आणि रायफलही दिसते. या टीझरमध्ये प्रभास शिवाय पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसला आहे. त्याचा लूक पाहून तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'सालार' हा चित्रपट किती चांगला असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. प्रशांत नील यांच्या या टीझर पाहून प्रेक्षकांची आतुरता खूप वाढली आहे. हा टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी कमेंट केली की हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर हिट ठरेल. 

दरम्यान, ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयाबालन यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं की 'केजीएफ 2' च्या क्यालमॅक्समध्ये 5 वाजून 12 मिनिटांवर रॉकी भाईवर अॅटक झाला होता आणि रॉकीचं जहाज समुद्रात बुडालं. आता प्रभासच्या या चित्रपटाचा टीझर देखील त्याचवेळी प्रदर्शित होणार आहे. हे पाहता प्रशांत नील हे चित्रपटातून काही कनेक्शन लावतील असं अनेकांना वाटू लागलं आहे. 

'सालार' हा 28 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय टिनू आनंद, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होईल. हा 'सालार' चा पहिला भाग आहे, ज्याचे नाव आहे Saalaar: Part 1-Ceasefire. या चित्रपटातून प्रभास आणि प्रशांत नील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.