प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार...

प्रभासला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 2, 2018, 03:25 PM IST
प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार... title=

मुंबई : बाहुबली चित्रपटाने लोकप्रिय झालेला आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहचलेला प्रभासला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. आणि आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असे दिसतेय. यापूर्वी करण जोहर प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार होता. मात्र प्रभासची 20 कोटींची मागणी ऐकून करणने आपला इरादा बदलला. मात्र बॉलिवूडमध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे संकेत खुद्द प्रभासनेच दिले आहेत.

काय म्हणाला प्रभास?

अलिकडेच एका मुलाखतीत प्रभासने आपल्या बॉलिवूडमधील पर्दापणाबद्दल खुलासा केला. मी हैद्राबादमध्ये राहतो. तिथले 60 टक्के लोक हिंदी बोलतात. मी खूप हिंदी चित्रपट पाहतो. त्यामुळे हिंदी भाषा मला परकी वाटत नाही. तसंच बॉलिवूडच्या अनेक चांगल्या ऑफर्स मला मिळाल्या. एका  स्क्रिप्टला होकार दिला असून ती एक प्रेमकथा आहे. साहो नंतर मी हा चित्रपट करणार आहे. 

 चित्रपटात व्यस्त 

सध्या प्रभास आपल्या साहो चित्रपटात व्यस्त आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषेत बनत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यांसारखे कलाकार आहेत.