Prajakta Mali खरंच संन्यास घेणार? अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वत्र उडवली खळबळ...

Prajakta Mali नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Feb 23, 2023, 05:49 PM IST
Prajakta Mali खरंच संन्यास घेणार? अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वत्र उडवली खळबळ... title=

Prajakta Mali Comment On becoming Monk : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची रानबाजार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्राजक्ता माळीची ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन पासून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, सध्या प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता तिनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. खरंतर तिच्या या पोस्टमुळे प्राजक्ता संन्यास घेण्यावर बोलली आहे. 

प्राजक्तानं ही पोस्ट तिच्या फेसबूक अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्तानं गुलाबी रंगाच्या साडीत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं तिचे आश्रमातील काही फोटो शेअर केले होते. या फोटोला शेअर केल्यानंतर प्राजक्ता अभिनय क्षेत्रातून संन्यास घेणार का असा प्रश्न उद्धवू लागला होता. दरम्यान, त्यावरच प्राजक्तानं आता पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे. प्राजक्तानं गुलाबी साडीतील हे फोटो शेअर करत कॅप्शन दिले की नाही नाही संन्यास नाही घेतलाय… खरंतर, संपूर्ण जग जिंकायला मी तयार आहे. हिमालयात नाही चालले, आश्रमात फार नाही राहिले... पुन्हा मुंबईला परतले “मायानगरी”. जिथे माझी खरी जागा आहे. 

हेही वाचा : Prajakta Mali चं फॅनपेज हॅक? चाहत्यांना या शब्दांत केली कळकळीची विनंती...

दरम्यान, आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की प्राजक्ता ही कोणत्या आश्रमात गेली होती. तर प्राजक्ता बंगळुरुमध्ये असलेल्या श्री श्री रवि शंकर यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी गेली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्राजक्तानं शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामुळेच ती संन्यास घेते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, प्राजक्तानं शेअर केलेल्या या पोस्टनंतर आता नेटकऱ्यांना त्यांचे उत्तर मिळाले आहे.