Prajakta Mali चं फॅनपेज हॅक? चाहत्यांना या शब्दांत केली कळकळीची विनंती...

Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. ही पोस्ट शेअर करत प्राजक्तानं तिच्या चाहत्यांना विनंती केली आहे.  

Updated: Feb 23, 2023, 04:28 PM IST
Prajakta Mali चं फॅनपेज हॅक? चाहत्यांना या शब्दांत केली कळकळीची विनंती... title=

Prajakta Mali Fan Page Hack : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची रानबाजार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्राजक्ता माळीची ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन पासून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, सध्या प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता तिनं शेअर केलेल्या एका मेसेजमुळे चर्चेत आली आहे. 

प्राजक्तानं तिच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. खरंतर प्राजक्ताचे अनेक फॅन पेज आहेत. त्यापैकी प्राजक्ताचं एक फॅनपेज हॅक करण्यात आलं आहे. दरम्यान, याविषयी प्राजक्ताला सगळी माहिती ही प्राजक्ताच्या दुसऱ्या काही चाहत्यांनी दिली आहे. त्यानंतर प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या लाखो चाहत्यांना सतर्क केले आहे. प्राजक्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना विनंती करत सांगितले आहे की फॅनपेज हॅक करण्यात आलं आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्राजक्ता माळीनं कॅप्शन दिलं की 'द क्वीन हे फॅनपेज हॅक करण्यात आलं आहे. कृपया अनफॉलो करा.' या सोबतच प्राजक्तानं तिच्या या फॅनपेजला अनफॉलो करण्यापासून रिपोर्ट करण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्यास सांगितले आहे. प्राजक्तानं ज्या फॅनपेजला अनऑलो करण्यास सांगितले आहे त्याला लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. 

हेही वाचा : VIDEO VIRAL : 'गावठी नोरा..., 'फ्रॅंड्री' फेम अभिनेत्री विचीत्र हावभावांच्या व्हिडीओमुळे ट्रोल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं श्री श्री रवि शंकर यांच्या आश्रमालाही भेट दिली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्राजक्तानं शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता ही रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. तर तसं काही नसून तिनं ही पोस्ट वर्ल्ड फूड डे निमित्ताने शेअर केली होती. यावेळी तिने तिचे आणि काही पदार्थांचे भन्नाट फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. 

मात्र त्या सोबतच तिने आणखी एक फोटो शेअर केला ज्यात ती एका मुलासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'वर्ल्ड फूड डेच्या शुभेच्छा. त्या व्यक्तीचं देखील खूप कौतुक केलं. जो फक्त तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्यासोबत जेवणासाठी पुणे मुंबई असा प्रवास करतो. खूप खूप धन्यवाद भावा.' ही पोस्ट जरी जूनी असली तरी सोशल मीडियावर ही पोस्ट पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.