आईच्या फोटोसमोर केक कापताना प्रतीक बब्बर भावूक; पण फोटोत टॅग केलेली 'ती' अभिनेत्री कोण?

Prateik Babbar News: आज स्मिता पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यांचे चाहते आणि त्यांचे कलाकार फॅन्स यावेळी त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी प्रतीक बब्बरची पोस्ट चर्चेत आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 17, 2023, 03:34 PM IST
आईच्या फोटोसमोर केक कापताना प्रतीक बब्बर भावूक; पण फोटोत टॅग केलेली 'ती' अभिनेत्री कोण? title=
prateik babbar post on smita patil birthday on instagram

Prateik Babbar News: आज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा 68 वा वाढदिवस आहे. त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. प्रतीक बब्बर यानंही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्याची चांगलीच चर्चा आहे. यावेळी त्यानं बरोबर 12 वाजता आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्यानं एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यानं लांबश्या टेबलवरती स्मिता पाटील यांचे खूपच सुंदर फोटो ठेवले आहेत. त्याच्यासमोर त्यानं दिवे लावले आहेत आणि केक ठेवला आहे. आपल्या आईच्या वाढदिवशी त्यानं केक कापला असून यावेळी हा इमोशनल फोटो त्यानं शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. परंतु त्यानं यावेळी एका अभिनेत्रीलाही टॅग केलं आहे. 

सध्या त्याच्या या फोटोवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी बॉबी देओल, अनुप सोनी, आयेशा श्रॉफ यांनी त्यांच्या या फोटोंवरून कमेंट्स केल्या आहेत. यावेळी सगळ्यांनी स्मिता पाटील यांना मानवंदना दिल्या आहेत. त्यामुळे त्याची ही पोस्ट चर्चेत आहे. प्रतीक हा अनेकदा आपल्या आईचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आताही त्यांच्या फोटोनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. स्मिता पाटील यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. स्मिता पाटील यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतून कामं केली आहेत. त्याचसोबत त्यांची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यांच्या अनेक चित्रपटांतून त्यांना खूप चांगली लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांची आजही चर्चा ही रंगलेली असते. प्रतीक बब्बरचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनीच त्यांचे निधन झाले होते. 

हेही वाचा : माईंड इट! रजनीकांतसोबतच 'या' Bollywood कलाकारांमुळं चष्म्याचीही फॅशन ट्रेंडमध्ये

त्यामुळे प्रतीक बब्बरला कधीच आईचं प्रेम हे मिळालं नाही. त्यामुळे कायमच ही उणीव प्रतीकच्या मागे होती. प्रतीक एका मुलाखतीत म्हणाला होता की, ''मी माझ्या आईसारखाच दिसतो. तुम्ही मला एक वीग आणून द्या, मी तिला तुमच्यासमोर जसच्या तसं उभं करेन.'' प्रतीकही चांगल्या चित्रपटांतून कामं करतो आहे. त्याचीही लोकप्रियता फार अफाट आहे. तो अनेक म्युझिक व्हिडीओजमधूनही कामं करतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टॅग केलेली अभिनेत्री कोण? 

फोटोतील ही अभिनेत्री आहे प्रिया बॅनर्जी. जिची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. तिनं आपले आणि प्रतीकचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. परंतु प्रतीकनं 2019 साली सान्या सागर हिच्याशी लग्न केले होते. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.