8 वर्षांची प्रतिक्षा! प्रत्युष्या बॅनर्जीच्या वडिलांची प्रतिक्रिया म्हणाले, 'आम्ही व्हिलन...'

Pratushya Bannerjee : अभिनेत्री प्रत्युष्या बॅनर्जीच्या मृत्यूनं सर्वत्र खळबळ माजवली होती. तिच्या आईवडिलांनी आपल्याला झालेला त्रास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी एका मुलाखतीतून यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

Updated: Sep 3, 2023, 01:42 PM IST
8 वर्षांची प्रतिक्षा! प्रत्युष्या बॅनर्जीच्या वडिलांची प्रतिक्रिया म्हणाले, 'आम्ही व्हिलन...' title=
Pratushya Bannerjee father expresses his anger and pain for past 8 years after his daughters death

Pratushya Bannerjee : 2016 मध्ये 'बालिका वधू' फेम प्रत्युष्या बॅनर्जी हिनं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं. त्यावेळी तिच्या आत्महत्येनं एकच खळबळ माजवली होती. तिच्या प्रियकारानं तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले? की तिचा खून झाला यावर समाजमाध्यमातूनही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यातून गेल्या 8 वर्षांपासून प्रत्युष्याचे आईवडिल आपल्या लेकीला न्याय मिळावा म्हणून झगडत आहेत. परंतु अजूनही प्रत्युष्याला न्याय हा मिळालेला नाही. परंतु यावेळी आपल्याला मुलीला न्याय मिळवण्यासाठी आपण लढणार असं त्यांनी एका मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. 2013 साली अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये फार मोठी धमाका झाला होता. अभिनेता सुरज पांचोलीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर दहा वर्षांच्या खटल्यानंतर सुरज पांचोलीला कोर्टानं निर्दोष मुक्त केले होते. यावेळी जिया खानच्या आईनं यापुढेही लढणार यावर स्पष्ट भुमिका मांडली होती. झीया खाननं प्रत्युष्या बॅनर्जीच्या आत्महत्येनं खळबळ माजवून दिली होती. 

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, प्रत्युष्या बॅनर्जीच्या मृत्यूप्रकरणात आरोपी असलेला तिचा प्रियकर राहुल राज सिंग याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तीन महिन्यांच्या कोठडीनंतर बेल मिळाली होती. या प्रकरणी राहुल राज सिंगनं केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे. इंडिया टूडेनं दिलेल्या रिपोर्टनुसार, या प्रकरणावरून डीस्चार्जसाठी राहुलनं याचिका केली होती जी कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यासोबत याप्रकरणामुळे त्याला बरेच नैराश्यही आले असल्याचे कळते आहे. त्यामुळे आता प्रत्युष्याचे आईवडिल हे आशावादी आहेत. या निर्णयामुळे त्यांना आशा वाटते आहे की तिला न्याय मिळेल. 

आज तकला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की ते यावर ठाम आहेत की त्यांच्या मुलीनं आत्महत्या केली नाही तर तिचा खुन करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ''आता सर्व गोष्टी या लोकांसमोर येतील. सत्य हे समोर येईलच. मी आणि माझ्या पत्नीनं गेली 8 वर्षे फार त्रास सहन केला आहे. आता आमच्या आयुष्याचे हेच ध्येय आहे की आम्हाला आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्हाला व्हिलनसारखी वागणूक दिली. माध्यमांनीही आम्हाला यावेळी त्रास दिला. अशाप्रकारे अनेक गोष्टी या बदलल्या गेल्या आणि आम्हाला व्हिलन बनवण्यात आले होते. यामुळे आमचा आत्मविश्वास खचला, आशाही संपली. आता हे समोर येईलच की या मुलानं आमच्या मुलीला मारलं आहे.''

''अजून खूप काही बाहेर येयाचे बाकी आहे. आम्ही खूप त्रास सहन केला आहे. त्यातून मला अशी इच्छा नाही की आम्ही जो त्रास सहन केला तोच त्रास कोण्या मुलीचे पालक सहन करतील.'', असं ते पुढे म्हणाले.