'भारतात मुस्लीम आहेत म्हणून तुम्ही...'; किरण मानेंचा सूचक इशारा

Kiran Mane :  किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेलं हे मीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 3, 2023, 01:16 PM IST
'भारतात मुस्लीम आहेत म्हणून तुम्ही...'; किरण मानेंचा सूचक इशारा title=
(Photo Credit : Social Media)

Kiran Mane : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. किरण माने हे सध्या 'सिंधूताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेत दिसत आहेत. दरम्यान, आता ते चर्चेत येण्याचे कारण त्यांची सोशल मीडिया पोस्ट आहे. किरण माने हे नेहमीच त्यांच्या पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. त्यात आता किरण माने यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मीम शेअर केलं आहे. हे मीम सोशल मीडियावर व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

किरण माने यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटर हे मीम शेअर केलं आहे. त्यांचं हे मीम 'द डार्क नाइट' या चित्रपटातला फोटो घेऊन बनवल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत मात्र, एक मराठी वाक्य असल्याचे पाहायला मिळते. त्यात असं म्हटलं आहे की 'पुन्हा एकदा सांगतो लक्षात घे, भारतात मुस्लीम आहे म्हणून तुम्ही हिंदू आहात; नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे राहणार'. तर हे मीम शेअर करत किरण माने म्हणाले की '...हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा.'

किरण माने यांनी हे मीम शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांना कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'माने सर ! खुप छान आणि समर्पक विचार आहे. पण धर्माची अफु मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळे बहुजनांना वास्तववाद पटत नाही. विश्वगुरु ,पंधरा लाख, जगातली तिसरी अर्थव्यवस्था ,आंतरराष्ट्रीय नेतृत्व,रशिया-युक्रेन युद्ध तासाभरासाठी थांबवले.... अशा थापाच मंदभक्तांना गोडगोड वाटतात.. एकदम बढिया!' दुसरा नेटकरी म्हणाला, 'एकदाच सांगतो लक्षात घे!सगळ्यात आधी तुम्ही फक्त हिंदू होता! त्यावेळी माणूस होण्याच्या मार्गावर होता. सुखी होता! मग मुस्लिम आले, इंग्रज आले,त्यांनी बरोबर माणसाला गुलाम बनवणारी गुलामगिरी आणली, मग त्यांनी बुद्धिभेद केल्यावर तुम्हाला हिंदूत जातीवाद दिसायला लागला! वसवस वाढली! विद्वेष वाढला! आता पुढेही तुम्ही पशूच राहणार का की बुद्ध होणार ?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हिंदू धर्मात जातीवादाची दुर्गंध आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'एक दम बरोबर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूप खोल अर्थ आहे ... थोडासा आपल्या बहुजनांनी विवेक जागा ठेवला पाहिजे....