'स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा

Snehal Tarde's Post : प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 26, 2024, 03:15 PM IST
'स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा  title=
(Photo Credit : Social Media)

Snehal Tarde's Post : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांची जोडी ही लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. प्रवीण तरडे आणि स्नेहल हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. स्नेहल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच स्नेहलनं एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. 

स्नेहलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्नेहलनं तिला मिळालेल्या एका सर्टिफिकेट आणि थोडक्यात तिनं घेतलेल्या शिक्षणाविषयी ती या पोस्टमधून सांगताना दिसते.  स्नेहलनं नुकताच ‘Study of Vedas’ हा अभ्याक्रम पूर्ण केला आहे. इतकंच नाही तर ती या परिक्षेत 78 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

याविषयी सांगत स्नेहलनं कॅप्शन दिलं की 'वेदांचा अभ्यास - स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे. त्या वेदांचा मी योग्य पद्धतीनं अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. पुण्यातील भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम या संस्थेतर्फे स्टडी ऑफ वेदाज या अभ्यासक्रमात 78 टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा'.

स्नेहलची पोस्ट पाहिल्यानंतर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, 'शुभेच्छा, तू आता या कोर्स विषयी सांगितल्यानंतर मला कळलं आणि मलाही आता हे शिक्षण घेण्याची इच्छा झाली.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'शुभेच्छा! नेहमीच काही तरी शिकायला मिळतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अभिमान वाटतो तुमचा!' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मनःपूर्वक अभिनंदन.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'स्नेहलताई वाचून आपल्याबद्दल अभिमान वाटला! आपलं मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्या पोस्टमुळे या कोर्सची माहिती मिळाली! धन्यवाद !'

हेही वाचा : 12 Lakh/Month भाडं... कोट्यवधी कमवूनही भाड्याच्या घरता राहतात 'या' अभिनेत्री

स्नेहलविषयी विषयी बोलायचे झाले तर ती देखील नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ती चर्चेत आहे.