प्रेग्नेंट Alia Bhatt पुन्हा एकदा ट्रोल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

या आउटफिटमुळे आलिया भट्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

Updated: Sep 3, 2022, 01:17 PM IST
प्रेग्नेंट Alia Bhatt पुन्हा एकदा ट्रोल, जाणून घ्या काय आहे प्रकरण title=
Pregnant alia bhatt once again trolled and know what is the matter

Alia Bhatt: सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चित कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यंदा ते त्यांचा आगामी 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या प्रमोनशनमुळे. ब्रह्मास्त्रची टीम प्रमोशनसाठी हैदराबाद आली होती. हे प्रमोशन आलियासाठी खूप खास होतं. कारण ती एका खास आउटफिट घालून आली होती. 

या आउटफिटमुळे आलिया भट्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिचा हा आउटफिट अनेकांना पसंतीस पडला आहे. तर काही यूजर्सने आलियाला ट्रोल केलं आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आईबाबा बनणार आहेत. त्यामुळे आलियाने या ड्रेसवर एक खास मेसेज लिहला होता. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या प्रमोशनच्या वेळी आलियाने आपल्या ड्रेस आणि लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आलियाने आपल्या ड्रेसवर ‘बेबी ऑन बोर्ड’ आणि ‘लव्ह-लव्ह’ असा खास संदेश लिहलेला होता. आलियाची ही स्टाईल काहींना आवडली, तर काहींनी नापसंतीही दर्शवली आहे.

आलियाच्या प्रेग्नेंसी लुकचं कौतुक करत एका चाहत्याने लिहलंय की, 'ती प्रेग्नेंसीमध्ये आणखी सुंदर दिसत आहे.' तर दुसरा यूजर्स म्हणतो की 'आउटफिट अप्रतिम दिसत आहे.' तर काही यूजर्सने तिच्यावर टीका केली आहे.