सेटवर असं काय घडलं? की प्रेग्नेंट Bharti Singh रडायचीच थांबेना

भारती इतकी भावूक झाली की ती रडायची थांबेना.

Updated: Feb 12, 2022, 01:32 PM IST
 सेटवर असं काय घडलं? की प्रेग्नेंट Bharti Singh रडायचीच थांबेना title=

मुंबई : कॉमेडीयन भारती सिंगला अश्रू अनावर झाले जेव्हा एका डान्स क्रूने तिच्या आणि हर्ष लिंबाचियाच्या प्रेमकहाणीला त्यांच्या परफॉर्मन्स मधून सादर केले.

कलर्सने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये भारती आधी हसताना आणि नंतर भावूक होत असल्याचे दिसत आहे. ती आणि हर्ष  यांचा मेत्री ते प्रेमात पडण्याचा प्रवास यावेळी दाखवण्यात आला आहे. त्यांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली आणि नंतर लग्न झाले याची संपुर्ण गोष्ट दाखवण्यात आली आहे.

परिणीती चोप्राने भारतीला मिठी मारून सांभाळलं. कारण तिने रडायला सुरुवात केली. त्यानंतर करण जोहरनेही तिला मिठी मारली. हा परफॉर्मन्स पाहून हर्षचेही डोळे पाणावले.भारती इतकी भावूक झाली की ती रडायची थांबेना.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फील क्रू या वीकेंडला, व्हॅलेंटाईन डे स्पेशल एपिसोडमध्ये भारती आणि हर्ष यांना त्यांचा परफॉर्मन्स समर्पित करताना दिसणार आहेत. अंकिता लोखंडेने कलर्सच्या इंस्टाग्राम पोस्टवर टिप्पणी केली, "खूप सुंदर, देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो." अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत.