मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात आसते. ती ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. शिवाय तिचे ट्विट अनेकदा चर्चेचा विषय देखील ठरतात. नुकताच प्रितीने ट्विटरवर तिच्या श्वानासोबत एक फोटो शेअर केला. तिच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिच्या श्वानाचे भरभरून कौतुक केले.
तिच्या श्वानाने तिचे प्राण वाचवले. म्हणून प्रितीने हा बोलका फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये श्वानाने तिचे प्राण कसे वाचवले याचा खुलासा केला आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
True love is when your puppy jumps into the jacuzzi to save you from drowning (at least that’s what he thinks) & gets completely flustered until You jump out. Here’s a pawesome moment with my canine baby #smitten #dutchshepherd #Bruno #BrunotheBrave #Dutchie #Truelove #ting pic.twitter.com/FmnoVi0ne4
— Preity G Zinta (@realpreityzinta) January 20, 2020
प्रिती जकुजीमधील पाण्यात बसली होती. तेव्हा त्या श्वानाला असं वाटलं की ती पाण्यात बुडत आहे. म्हणून तिला वाचवण्यासाठी त्याने पटकन जकुजीमधील पाण्यात उडी मारली. त्याचे हे प्रयत्न पाहिल्यानंतर प्रितीने ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली.
कुत्रा हा इमानदार प्राणी असल्याचं आपण अनेक वेळा ऐकलं आहे. मात्र प्रितीला याठिकाणी त्याचा प्रत्यय आला. आपल्या निखळ हास्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या प्रितीने बॉलिवूड अनेक प्रसिद्ध चित्रपटं दिली आहेत. ती आता रूपेरी पडद्यावर दिसत नसली तरी तिचे आजही असंख्य चाहते आहेत. तीने 'दिल से' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
सोल्जर’, ‘क्या कहना’, ‘चोरी-चोरी चुपके चुपके’, ‘दिल चाहता है’, ‘कोई मिल गया’, ‘कल हो ना हो’ अशा अनेक एकापेक्षा एक चित्रपटांमधील तिची भूमिका चांहत्यांच्या पसंतीस पडली. बॉलिवूड शिवाय तिने तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.