मुंबई : कमल हासनची लहान मुलगी अक्षरा हसनचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 5 नोव्हेंबर रोजी हे फोटो सोशल मीडियावर लीक झालेत. 'शमिताभ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या अक्षराने सोशल मीडियावर भडास काढली आहे.
अक्षराने ट्विटरवर ट्विट करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. ही खूप दुःखाची गोष्ट आहे की, देशभरात मी टू चळवळ सुरू असताना आपल्या स्वार्थासाठी एका मुलीचे खाजगी फोटो इंटरनेटवर लीक करत आहेत.
@MumbaiPolice @Cybercellindia pic.twitter.com/JS1lJVdD6u
— Kutty Haasan (@aksharahaasan1) November 7, 2018
सोशल मीडियावर अक्षराचे फोटो लीक झाल्यानंतर खूप चर्चा होतेय. हे फोटो एडिट केलेले आहेत अशी कबुली स्वतः अक्षराने दिली असून आपण सायबर क्राइमचे शिकार झाल्याचे दिने कबुल केले आहे.
तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नुकतेच माझे खाजगी फोटो इंटरनेटवर लीक झाले आहे. हे सगळं कुणी आणि का केलं हे मला नाही माहित. पण मला एक माहित आहे की, एका तरूण मुलीचे फोटो असे लीक करणं हे तिला त्रास देण्यासाठी केलेलं कृत्य आहे.