Priya Prakash Varrier: प्रियाने शेअर केला नदीत अंघोळ करतानाचा व्हिडीओ, म्हणाली, "मला अगदी..."

Priya Prakash Varrier Bath Swimming In River Shared Video: रातोरात सोशल मीडियावरुन व्हायरल झालेल्या प्रियाने नुकताच इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

Updated: Feb 9, 2023, 06:14 PM IST
Priya Prakash Varrier: प्रियाने शेअर केला नदीत अंघोळ करतानाचा व्हिडीओ, म्हणाली, "मला अगदी..."
priya prakash varrier

Priya Prakash Varrier Bath Swimming In River Shared Video: एका व्हायरल व्हिडीओमुळे नॅशनल क्रश म्हणून ओखळी जाऊ लागलेली प्रिया प्रकाश वारियर (priya prakash varrier) सध्या पुन्हा चर्चेत आहे. डोळा मारतानाच्या एका व्हिडीओमुळे देशभरामध्ये ओळख मिळालेल्या या अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केलेला नवा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला आहे. रातोरात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे प्रिया सोशल मीडियावरही स्टार झाली आहे. ती अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. विंकल गर्ल नाव मिळावलेल्या प्रियाने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात ती नदीमध्ये अंघोळ करताना दिसत आहे.

कॅप्शनने वेधलं लक्ष

शांत आणि सुंदर अशा नदी किनारी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सूर्यास्ताची वेळ असल्याचं दिसून येत आहे. प्रिया प्रकाश वारियर या व्हिडीओमध्ये नदीत कॅमेराकडे पाहून पोज देताना दिसत आहे. कधी उजवीकडून वळून पाहणारी प्रिया तर तर कधी क्लोजअप शॉटमधून थेट सूर्यास्तापर्यंत जाणारा शॉट या व्हिडीओत दिसत आहेत. प्रियाने या व्हिडीओ दिलेली कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे. "मला अगदी जलपरी असल्यासारखं वाटत आहे", असं प्रियाने कॅप्शनमध्ये म्हटलंय. या व्हिडीओला 3 तासांमध्ये 1 लाख 20 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी प्रियाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. 

लवकरच दिसणार या चित्रपटांमध्ये

प्रिया प्रकास वारियर अवघ्या 23 वर्षांची असून तिला अल्पावधीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. प्रियाचा जन्म 1999 साली केरळमधील त्रिशूर येथे 28 ऑक्टोबर रोजी झाला. ओरू अडार लव हा प्रियाचा पहिला चित्रपट होता. प्रियाने 2021 मध्ये 'चेक' नावाच्या चित्रपटामधून तेलुगू चित्रपटांच्या जगात पहिलं पाऊल ठेवलं. प्रिया प्रकाश वारियर येणाऱ्या काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. भविष्यात प्रिया विष्णुप्रिया, श्रीदेवी बंगलो आणि यारियां 2 या चित्रपटांमध्ये झळणार आहे. यारियां 2 या चित्रपटाचं दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू करत आहेत. चित्रपटामध्ये प्रियाबरोबरच यश कुप्ता, पर्ल व्ही पुरी आणि दिव्या खोसला कुमारही झळकणार आहे.