Prabhas and Kriti Sanon Engagement : तूफान चर्चेनंतर अखेर क्रिती सेननने सोडलं मौन, म्हणाली...

Kriti नं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत साखरपुड्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आदिपुरूष चित्रपटासाठी क्रिती आणि Prabhas एकत्र काम करत आहेत. 

Updated: Feb 9, 2023, 06:09 PM IST
Prabhas and Kriti Sanon Engagement : तूफान चर्चेनंतर अखेर क्रिती सेननने सोडलं मौन, म्हणाली...

Prabhas and Kriti Sanon Engagement : ‘बाहुबली’ (Bahubali) फेम अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. गेल्या काही दिवसांत प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या (Prabhas and Kriti Sanon) यांचे नाव एकत्र जोडले जात आहे. प्रभास आणि क्रिती एकत्र असल्याचे बातमी ही 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या शूटिंगनंतर सुरु झाली होती. नुकतीच त्यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली होती. प्रभास आणि क्रिती हे दोघं मालदीवमध्ये साखरपुडा करणार असल्याचे देखील म्हटले जात होते. दरम्यान, साखरपुड्याच्या बातमीवर क्रितीनं सेननं सोशल मीडियावर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे. तर प्रभासच्या टीमनं यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

क्रितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये क्रितीनं हॉलिवूड आयकॉन ओप्रा विन्फ्रेचं एक मोटिवेश्नल रील शेअर केलं आहे. या रीलमध्ये Letting Go असे लिहिले आहे. ओप्रा विन्फ्रे या रीलमध्ये आर्ट विषयी बोलताना दिसते की 'म्हणून लोकांना ते जसे आहेत तसेच राहू द्या कारण एकतर तुम्ही त्या गोष्टीला स्विकृती देतात किंवा नाही. असे करणे टाळले नाही की तुम्ही अशा परिस्थितीत अडकता ज्यामुळे तुमचा खूप वेळ वाया जातो. त्यासोबतच तुमची एनर्जी देखील वाया जाते. हा व्हिडीओ शेअर करत क्रितीनं शब्द असं कॅप्शन दिलं आहे. 

Prabhas and Kriti Sanon Engagement actress shares cryptic post on about it

यापूर्वी, ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभासच्या टीमने प्रभास आणि क्रितीच्या एंगेजमेंटच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. अभिनेत्याच्या टीमने सांगितले होते की, दोघेही फक्त मित्र आहेत, टीमनं दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की 'प्रभास आणि क्रिती फक्त मित्र आहेत. त्यांच्या एंगेजमेंटची बातमी खरी नाही.

हेही वाचा : PM Modi यांनी नाव न घेता केलं Pathaan चं कौतुक? शाहरुखच्या चाहत्यांनी केला...

'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभास आणि क्रिती सेननची (Prabhas and Kriti Sano) केमिस्ट्री पाहून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं चाहत्यांना वाटलं होतं. प्रभास आणि क्रिती एकमेकांवर प्रेम करत असल्याच्या बातमीही वाऱ्यासारखी पसरली होती. प्रभासनेही क्रितीला प्रपोज केले असून दोघेही लवकरच लग्न करणार आहेत इथं पर्यंत गोष्ट पोहचली होती. अशातच वृत्तांवर विश्वास ठेवला तर, हे कथित जोडपे लवकरच त्यांच्या नात्याची व लग्नाची घोषणा करणार आहेत.

प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच (Adipurush) 'आदिपुरुष'मध्ये एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत. 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर टीझर विरोधात जोरदार  टीका झाली आहे. व्हीएफएक्सपासून ते कलाकारांच्या लूकपर्यंत सगळ्याच गोष्टीवर त्यांना ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, जे चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. त्यांना अजून थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. कारण सर्वात आधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता त्याच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.