प्रियाचे हे ही हावभाव ठरले लोकप्रिय...

व्हायरल झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरने देशभरातील अनेक तरुणांचे मन जिंकले.

Updated: Apr 13, 2018, 04:49 PM IST
प्रियाचे हे ही हावभाव ठरले लोकप्रिय... title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी इंटरनेट व्हायरल झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरने देशभरातील अनेक तरुणांचे मन जिंकले. तिचे व्हिडिओज इतके झटपट व्हायरल झाले की, तिला व्हायरल गर्ल म्हणून ओळखले जावू लागले. हे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर प्रियाचे नाव खूप प्रसिद्ध झाले. आता तिचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत प्रिया तिचा पार्टनर रोशन अब्दुल रऊफसोबत दिसत आहे.

नवा व्हिडिओ आला समोर

प्रियाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. यात पुन्हा एकदा प्रियाचा मस्तीभरा अंदाज पाहायला मिळाला. प्रियाचे हे हावभाव प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. यात प्रियाने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅंट घातली आहे. 

 

You may have to fight the battle more than once to win it Pc: @vyshakh_edappal

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

 

Be you Pc: @ajmal_photography_

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

मोठमोठ्या ब्रॅँडचे प्रमोशन

प्रियाचे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स ५० लाखांनी वाढले. त्यानंतर प्रियाने तिच्या अकाऊंटवरून मोठमोठ्या ब्रॅँडचे प्रमोशन सुरु केले. रिपोर्ट्नुसार प्रिया प्रकाश एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ८ लाख रुपये चार्ज करते.
गुगल सर्चमध्येही प्रिया प्रकाशने दीपिका पदुकोण, सनी लियोनी या अभिनेत्रींना मागे सोडले आहे. हे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर प्रियाला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. मात्र तिने त्या नाकारल्या.