प्रिया वॉरियर देतेय 'फ्री अॅटीट्यूड'

प्रिया प्रकाश नुकतीच एका चॉकलेटच्या जाहिरातीत दिसली.मंच चॉकलेटच्या या जाहिरातीत ती एका खेळाडूला एटीट्यूड दाखवत आहे. 

Updated: Apr 20, 2018, 09:22 PM IST
प्रिया वॉरियर देतेय 'फ्री अॅटीट्यूड'
मुंबई : प्रिया प्रकाश नुकतीच एका चॉकलेटच्या जाहिरातीत दिसली.मंच चॉकलेटच्या या जाहिरातीत ती एका खेळाडूला एटीट्यूड दाखवत आहे. ही जाहीरात तिच्या फॅन्सना खूप आवडतेय. या जाहिरातीबद्दल बोलायच झाल तर प्रिया प्रकाश स्टेडियममध्ये बसलेली असते. काही अंतरावर क्रिकेटर्स प्रॅक्टिस करत असतात. जेव्हा प्रियाकडे बॉल येतो तेव्हा एक खेळाडू तिला तो बॉल देण्यास सांगतो. पण ती अॅट्यीट्यूड दाखवत बॉल देण्यास नकार देते. 'मै फेकी हुई चीज नही उठाती |' असे ती त्याला सांगते. मंचसोबत फ्रिचा अॅटीट्यूडदेखील मिळतोय असे तिला सांगायचे असते. 
 

हा व्हिडिओ काहीसा वेगळा

यापूर्वी व्हायरल झालेला व्हिडिओ हा मल्याळम सिनेमा उरू अदार लव या सिनेमातील होता. पण आता इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ काहीसा वेगळा आहे. या व्हिडिओत प्रिया मेकअप करताना दिसत आहे. मेकअप झाल्यानंतर ती तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत आहे.
 

प्रिया यात ठरली अव्वल

प्रिया प्रकाश गुगल सर्चमध्ये अव्वल ठरली आहे. तिने चक्क सनी लियोनीला मागे टाकले आहे. तिची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त सनीच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफलाही तिने मागे टाकले आहे. इतकंच नाही तर इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोव्हर्स रातोरात वाढले.