प्रियंका चोप्रा आणि निक जोनसला मिळाला लग्नाचा परवाना

लवकरच होणार लग्न 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसला मिळाला लग्नाचा परवाना

मुंबई : बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनसला अमेरिकेत लग्नाचा परवाना मिळाला आहे. दोघं यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करत आहे. 'दब्लास्ट डॉट कॉम' या वेबसाइटनुसार, यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांच लग्न झालं होतं. गेल्या आठवड्यात दोघं ही ब्रेवरी हिल्स कोर्टहाऊसमध्ये गेले होते. तिथे त्यांनी लग्नाच्या परवान्यासाठी कागदपत्रे जमा केले आहेत. 

रिपोर्टनुसार, दोघं लग्नाचा हा परवाना डिसेंबरमध्ये भारतात आणण्याचा विचार करत आहेत. डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर हा परवाना ते अमेरिकेत सादर करतील. त्यानंतरच त्यांच लग्न या दोन्ही देशात वैध मानलं जाणार आहे. प्रियंका आणि निक यावर्षी डिसेंबरच्या राजस्थामधील मेहरानगड किल्यावर लग्न करणार आहेत. 

सूत्रांचा हवाला देत 'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाच्या लग्नसोहळ्यासाठी सेलिब्रिटी मंडळींना बोलावणं आलं नाही आहे. त्यामुळे आता इतरांप्रमाणेच त्यांनाही प्रियांकाचा विवाहसोहळा पाहण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. लग्नसोहळ्यासाठी फार पाहुण्यांना आमंत्रित न करणारी प्रियांका रिसेप्शनमध्ये मात्र तिच्या संपूर्ण मित्रपरिवाराला आमंत्रित करेल हे नक्की.