परदेशात राहूनही Priyanka Chopra मात्र देसीच, कायमच सोबत ठेवते 'या' 3 गोष्टी

प्रियंका चोप्राचा हॉलिवूडमध्येही दबदबा 

Updated: Dec 18, 2021, 11:34 AM IST
परदेशात राहूनही Priyanka Chopra मात्र देसीच, कायमच सोबत ठेवते 'या' 3 गोष्टी  title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहे. प्रियंका चोप्रा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील लोकप्रिय आहे. नुकताच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला. ज्याची चर्चा सगळीकडेच रंगली. परदेशात वास्तव्य असूनही प्रियंका आपल्या मायदेशाशी कशी जोडली गेली? याच गुपित तिने उलगडलं आहे. 

प्रियंका परदेशात असूनही तिच्याकडे कायमच तीन गोष्टी असतात. ज्या तिला तिच्या मातीशी जोडून ठेवतात. 

प्रियंका कार्यक्रमात म्हणते की, जरी माझं वास्तव्य परदेशात असलं तरीही माझ्यामध्ये भारत वसलेलं आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रियंका असली तरीही तिच्यासोबत तिचं देवघर, लोणचं आणि तिची आई मधु चोप्रा (Madhu Chopra) कायमच तिच्यासोबत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

मुलाखतीत प्रियंका म्हणते,'मला तुम्ही भारतातून काढू शकता. पण माझ्यातून भारत काढू शकत नाही.' तसेच प्रियंका पुढे म्हणते की, ती हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीमध्ये खूप छान बॅलेन्स करू शकते. 

प्रियंका "द मॅट्रिक्स रिसरेक्शन' (The Matrix Resurrections) मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती सतीच्या भूमिकेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

मात्र, नुकत्याच झालेल्या एका पोस्टमुळे प्रियांका चोप्रा देखील चर्चेत आली होती. खरं तर, एका लेखात प्रियांका चोप्राला अमेरिकन गायक निक जोनासची पत्नी म्हणून संबोधण्यात आले होते.

यावर अभिनेत्रीने आक्षेप घेतला आणि प्रत्युत्तर देत 'बर्‍याचदा महिलांसोबत असं का होतं' असं म्हटलं. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिची इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी स्वतंत्र ओळख आहे आणि तिच्याकडे तसे पाहिले पाहिजे.