Ravi Kishan Casting Couch Experience : कास्टिंग काउचचा शिकार फक्त अभिनेत्री नाही तर बऱ्याचवेळा अभिनेता देखील होतात. हे वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. आज तेच कलाकार त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी झाले आहेत. त्यातील काही कलाकारांनी त्यांना आलेले कास्टिंग काऊचचे अनुभव आता सांगितले आहेत. या यादीत भोजपुरी अभिनेता आणि खासदार रवि किशन (Ravi Kishan) यांचे देखील नाव आहे. रवि किशन यांनी कोणत्याही महिलेच नाव न घेता त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. (Casting Couch)
रवि किशन यांनी अनेक भोजपुरी चित्रपट केले आहेत. रवि किशन यांनी फक्त भोजपुरी नाही तर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम कले. रवि किशन यांनी 1992 साली पिताम्बर या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. इतकंच काय तर रवि किशन हे ‘बिग बॉस’ च्या पहिल्या सीजनमध्ये देखील स्पर्धक म्हणून आपल्याला दिसले होते. दरम्यान, लाखो प्रेक्षकांची मने जिंकलेल्या रवि किशन यांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
आपकी अदालत या शोमध्ये रवि किशन यांनी सांगितलं की 'मी त्या महिलेच नाव घेणार नाही कारण आज तिचं नाव आहे. पण एकदा त्या मला म्हणाल्या होत्या की रात्री कॉफी प्यायला या. त्यांनी का इनव्हाईट केलं हे मला कळालं होतं म्हणून मी लगेचच त्यांना नकार दिला.'
रवि किशन पुढे म्हणाले, 'माझे वडील मला म्हणाले होते की आपण आपलं काम इमाणदारीनं करायला हवं. प्रामाणिक रहा आणि कोणताही शॉर्टकट घेण्याचा विचार करू नका. मला माहित होतं की माझ्यात प्रतिभा आहे आणि एक दिवस मला यश मिळेल. खरंतर कास्टिंग काऊचचा अनुभव इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच येतो, पण अशावेळी समजुतदारपणे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.'
हेही वाचा : Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral
रवि किशन यांनी बॉलिवूडमध्ये ‘कीमत’, ‘तेरे नाम’, ‘फिर हेरा फेरी’, ‘तनु वेड्स मनु’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील रवि किशन यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे तिथेही लाखो चाहते आहेत.