प्रियंका चोप्राच्या आई-वडिलांनी 'या' कारणामुळे कंटाळून तिला पाठवलं होतं हॉस्टेलमध्ये

प्रियंकाने आपल्या अभिनयाचा यशस्वी प्रवास बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत केला आहे

Updated: Jul 11, 2021, 09:09 PM IST
 प्रियंका चोप्राच्या आई-वडिलांनी 'या' कारणामुळे कंटाळून तिला पाठवलं होतं हॉस्टेलमध्ये title=

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोण ओळखत नाही. प्रियंकाने आपलं कौशल्य जगभर पसरवलं आहे. प्रियंकाने आपल्या अभिनयाचा यशस्वी प्रवास बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत केला आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लहानपणापासूनच प्रियंका चोप्राने तिच्या पालकांचा दम घुटमळला होता. बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री प्रियांका चोप्रा मनोरंजच्या विश्वात खूप पुढे निघुन गेली आहे. पण आज लोकांच्या मनावर राज्य करणारी प्रियंका तिच्या बालपणात आई-वडिलांना खूप त्रास द्यायची.

एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने खुलासा केला होता की, तिला लहानपणी 'नाही' म्हणायला आवडायचं. ती प्रत्येक गोष्टीवर नाही म्हणायची, या गोष्टीवरुन तिच्या घरचे तिच्यावर खूप नाराज असायचे. प्रियांकाने सांगितलं की, ती असं करायची कारण तिला नाही बोलल्याने खूप स्ट्रान्ग फिल वाटायचं. पण या सवयीमुळे तिला हॉस्टेलमध्ये जावं लागलं.

प्रियांका चोप्रा लहानपणापासूनच खूप खोडकर आहे. इतकंच नाही तर तिने अनेकवेळा आपल्या पालकांना लोकांसमोर अडचणीत आणलं आहे. प्रियंकाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, जेव्हा ती लहानपणी वडिलांसोबत आर्मीच्या कॅन्टीनमध्ये जेवत होती आणि त्या दरम्यान तिने एका मोठ्या अधिकाऱ्यांची नक्कल करायला सुरुवात केली, त्यानंतर तिच्या वडिलांना लाज वाटली.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, प्रियंका चोप्राला तिच्या बालपणात 'मिट्ठू' म्हटलं जायचं. कारण ती बरीच बडबड करायची. प्रियंकाने असंही सांगितलं की, तिला 'मिट्ठू' हे नाव अजिबात आवडत नाही. प्रियांकानेही या मुलाखतीत हाही खुलासा केला होता की, प्री-बोर्ड टाळण्याची तिने मिस इंडियामध्ये भाग घेतला होता.