'या' भारतीय क्रिकेटरसोबत प्रियांका चोप्राला करायचं होतं लग्न, स्वप्न राहिलं अधुरं...

क्रिकेट विश्वातील आणि बॉलिवूडमधील अनेक नावांचा समावेश आहे.

Updated: Sep 26, 2022, 04:12 PM IST
'या' भारतीय क्रिकेटरसोबत प्रियांका चोप्राला करायचं होतं लग्न, स्वप्न राहिलं अधुरं...

मुंबई : क्रिकेट जगतात आणि बॉलिवूड यांचं नेहमीच जुनं नातं राहिलं आहे. या यादीत आपल्या क्रिकेट विश्वातील आणि बॉलिवूडमधील अनेक नावांचा समावेश आहे. जर आपण बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोललो तर, प्रियांका चोप्राला आपण सर्वजण चांगले ओळखत असाल. जिने आपल्या मेहनतीने बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास केला आहे.

 आजच्या काळात प्रियांका चोप्राकडे संपत्ती आणि प्रसिद्धीची कमतरता नाही.  प्रियांका चोप्रा जेव्हा मिस वर्ल्ड बनली. तेव्हापासून तिने फिल्म इंडस्ट्रीत आपलं करिअर केलं. आणि तिचा एक व्हिडिओ देखील आहे. जो त्यावेळचा आहे. जेव्हा तिला मिस इंडियामध्ये भाग घ्यायचा होता. त्यादरम्यान शाहरुख खान जज म्हणून आला होता. आणि त्यानंतर शाहरुखने प्रियांकाला प्रश्न विचारला. लग्नासाठी तुला कोणाची निवड करायची आहे. असं तो म्हणाला. मात्र, शाहरुख खानने यासाठी प्रियांकाला 3 पर्यायही दिले.

लग्नासाठी तुम्ही महान भारतीय खेळाडू अझहर सारख्या माणसाची निवड कराल, जो तुम्हाला जगभर घेऊन जाईल. ज्याचा तुम्हाला आणि देशाला अभिमान वाटेल. किंवा स्वारोवस्की सारखा कलात्मक व्यावसायिक निवडाल जो तुम्हाला दागिने आणि हार गिफ्ट करेल. किंवा माझ्यासारखा एखादा हिंदी चित्रपट स्टार निवडाल जो इथे बसून तुम्हाला काल्पनिक विवाहाशी संबंधित कठीण प्रश्न विचारत असेल. मात्र, त्यावेळी प्रियांका चोप्राने स्वत: कबूल केलं होतं की, तिला शाहरुख खानवरही क्रश आहे.

यादरम्यान या दोन्ही सेलिब्रिटींच्या अफेअरच्या चर्चाही खूप गाजल्या. पण या सर्व गोष्टी विसरून प्रियांकाचं उत्तर खूपच आश्चर्यचकित करणारं होतं. कारण या उत्तराला उत्तर देत प्रियांकाने सांगितलं की, तिला भारतीय खेळाडू अझहरसोबत लग्न करायला आवडेल.

ती पुढे म्हणाली की, ज्याच्याशी मी लग्न करेन त्याचा संपूर्ण देशाला  खूप अभिमान वाटेल.  शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा या दोघांनी डॉन 2 चित्रपटात एकत्र काम केलं आहे.