सोशल मीडियावर प्रियंकाच्या 'या' ड्रेसची चर्चा नेमकी का सुरुये? जाणून घ्या

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Updated: Jul 14, 2021, 11:08 PM IST
सोशल मीडियावर प्रियंकाच्या 'या' ड्रेसची चर्चा नेमकी का सुरुये? जाणून घ्या title=

मुंबई : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका न्यूयॉर्कला गेली होती. तिथल्या प्रियंकाच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. व्हाईट थाय स्लिट आउटफिट, गोल गोल्डन इयररिंग्ज, त्याचबरोबर हाय हील्स सँडल देखील सध्या चर्चेत आहे. प्रियंका चोप्राचा हा क्लासिक लूक होता. हे फोटो न्यूयॉर्कमधील सोना रेस्टॉरंटचे असून या रेस्टॉरंटची मालक प्रियांका चोप्रा आहे.

नुकतीच प्रियंकाने या रेस्टॉरंटला भेट दिली होती. यादरम्यान तिने केलेला लूक चर्चेत आला आहे.प्रियांकाने आपला क्लासी लूक गोल्डन घड्याळासह आणि सोन्याच्या ब्रेसलेटने पूर्ण केला. केवळ अ‍ॅक्सेसरीजच नव्हे तर प्रियंकाच्या डोनट बन हेअरस्टाईलने या लूकमध्ये भर टाकली. जे त्यांच्यावर खूप होतं.

 

हातातलं ड्रिंक आणि तिच्या चेहऱ्यावरील एक सुंदर स्माईल हे सांगण्यास पुरेसं होतं की, रेस्टॉरंट यशस्वीरित्या चालू आहे. मार्चमध्येच प्रियंकाने रेस्टॉरंटच्या व्यवसायात प्रवेश केला.

'न्यूयॉर्क शहर के बीचों बीच कालातीत भारत' असं प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी असलेलं प्रियंका चोप्राचं रेस्टॉरंट नुकतंच सुरू करण्यात आलं आहे. काही काळापूर्वी प्रियंका स्वत: तिथे पोहोचली होती आणि गोलगप्पे खात होती. प्रियंकाने आपल्या आईचा वाढदिवस देखील सोना रेस्टारंटमध्ये सेलिब्रेट केला होता. आणि मित्र मैत्रिणींसोबत पार्टीदेखील केली होती.