पुलवामा बदला, कंगनाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

अभिनेत्री कंगणा राणौतने भारतीय वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले आहे. बॉलीवुडमधील प्रत्येकाने 'सर्जिकल स्ट्राइक 2.0' म्हणून या ऑपरेशनचे स्वागत केले.

Updated: Feb 26, 2019, 06:55 PM IST
पुलवामा बदला, कंगनाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार title=

मुंबई : मंगळवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भारतीय वायूदलाने पकिस्तानी दहशत स्थळांवर ही कारवाई केली आहे. भारतीय वायूदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. सोशल मीडिच्या माध्यमातून ते आपले मत व्यक्त करत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार अजय देवगण, कमल हसण, परेश रावल आणि आता अभिनेत्री कंगणा राणौतने भारतीय वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले आहे. बॉलीवुडमधील प्रत्येकाने 'सर्जिकल स्ट्राइक 2.0' म्हणून या ऑपरेशनचे स्वागत केले.

'भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या आव्हानात्मक कामगिरी नंतर आपण त्यांना सलाम केले पाहिजे. ते खऱ्या अर्थाने देशाचे हिरो आहेत.आणि निर्णायक कारवाईसाठी सन्माननीय पंतप्रधानांचे आभार. आता खरी दहशतवादविरूद्ध आपल्या लढाईला प्रारंभ झाला आहे, जो भी बुरी नजर से देश को देखेगा उसका आंखे नोचली जायेंगी.....जय हिंद'

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने २०० ते ३०० दहशदवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्याची अधिकृत घोषणा परदेश सचिव विजय गोखले यांनी केली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर वायुदलाने १००० किलोची स्फोटकांसहीत हल्ला केला. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. भारतीय वायूदलाच्या १२ 'मिरज २०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळं उद्ध्वस्त केली.

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.