प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान च्या कॉन्सर्टवर पुणे पोलिसांची कारवाई! नेमकं काय घडलं? जाणून घ्या..

A R Rahman Live Concert Pune: A R Rahman चा नुकताच पुण्यात कॉन्सर्ट होता. त्यावेळी हजोरांच्या संख्येनं प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. त्या दरम्यान, सगळे कॉन्सर्टचा आनंद घेत असताना अचानक पुणे पोलिसातील कर्मचाऱ्यांनं स्टेजवर जात ए आर रहमानला शो बंद करण्यास सांगितले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 1, 2023, 04:56 PM IST
प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान च्या कॉन्सर्टवर पुणे पोलिसांची कारवाई! नेमकं काय घडलं? जाणून घ्या.. title=
Pune Police Take Action On A R Rahman Program video viral

A R Rahman Live Concert in Pune: प्रसिद्ध संगीतकार 'ए आर रहमान' (A R Rahman) सध्या त्याच्या टूरमध्ये व्यस्त आहे. तो सतत कुठे ना कुठे शो करताना दिसत आहे. नुकताच ए आर रहमानचा पुण्यात एक कॉन्सर्ट होता. त्या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान ए आर रहमानला पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. ए आर रहमानचा हा शो चांगलाच रंगला होत्या. त्यामुळे गाण्याचा आवाज आणि वेळ या दोन्ही गोष्टी नियमां पेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे पुणे पोलिसांनी स्टेजवर येत ए आर रहमानचा शो बंद केला. इतकंच काय तर ए आर रहमानला सुनावले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

ए आर रहमानचा हा शो पुण्यात 10 वाजल्यानंतरही सुरुच होता. हे पाहता त्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले, इतकंच काय तर ते कॉन्सर्टमध्ये खाली न थांबता थेट स्टेजवर गेले. ए आर रहमानसमोर जाणून त्यांनी घड्याळाकडे हात दाखवत वेळ काय झाली हे सांगितलं. तरी देखील ए आर रहमानची बॅन्ड टीम थांबली नाही हे पाहता ते एका बॅन्ड मेंबरकडे गेले आणि त्याला ओरडत बंद करण्यास सांगितले. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता असे म्हणत ए आर रहमान यांना तोंडावरच सुनावले. हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी हजेरी लावली. याशिवाय पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यावेळी ए आर रहमानचं लोकप्रिय आणि गाजलेलं गाणं छैय्या छैय्या हे सुरु होतं. त्या गाण्यावर तिथे आलेल्या चाहते आनंद घेत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानं लगेच ए आर रहमाननं कॉन्सर्ट थांबवला आणि तो सगळ्यांना धन्यवाद म्हणाला, शिवाय त्याला पुणे पोलिसांनी जे केलं ते आवडल्याचं देखील बोलताना तो व्हिडीओत दिसत आहे. 

हेही वाचा : '...अन् मी अंकुशला विसरून गेलो', Maharashtra Shahir पाहिल्यानंतर शरद पवार असं का म्हणाले?

दरम्यान, हा कॉन्सर्ट पाहता अनेकांनी पुणे पोलिसांनाच ट्रोल केलं आहे. अनेकांचे म्हणणे आहे की राजा बहादुर मिल परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत. हा परिसर सायलेंट झोन असतानाही पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे. या कार्यक्रमामुळे पुणे स्टेशन आणि परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे या सगळ्यांचा इतरांना खूप त्रास झाला. हे पाहता काही नागरिकांनी त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.