'महाराष्ट्र शाहीर'चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार असं का म्हणाले? "मी अंकुश चौधरीला...'

Maharashtra Shaheer Movie: महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा सुरु होती. अनेकांनी चित्रपटाचं कौतुक केलं तर दुसरीकडे यात फक्त सर्वसाधारण लोक नाही तर सेलिब्रिटींपासून राजकारणी देखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे शरद पवार आहेत.

दिक्षा पाटील | Updated: May 1, 2023, 02:13 PM IST
'महाराष्ट्र शाहीर'चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार असं का म्हणाले? "मी अंकुश चौधरीला...' title=
(Photo Credit : Social Media)

Sharad Pawar on Maharashtra Shahir Movie : 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहीर साबळे (Shaheer Sable) यांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटातून त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट पाहणारा प्रत्येक व्यक्ती चित्रपटाचे कौतूक करत आहेत. इतकंच काय तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ज्या प्रकारे हा चित्रपट बनवला त्याची स्तुती तर अनेकांनी केली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव जोडले आहे. 

शरद पवार यांनी काल म्हणजेच 30 एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांच्यासोबत हा चित्रपट पाहिला. त्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी हा चित्रपट पाहतांना त्यांना काय वाटले याविषयी सांगितले आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाचं शरद पवारांनी फक्त कौतुक केलं नाही तर संपूर्ण टीमला चित्रपटासाठी खूप शुभेच्छाही दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महाराष्ट्र शाहीर द फिल्म या चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अंकुश चौधरी, केदार शिंदे, सना शिंदे आणि चित्रपटातील इतर लोक दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं आहे की मा. शरद पवार साहेब, यांच्यासाठी खास खेळाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया! तुम्हाला चित्रपट आवडला आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवारांनी अंकुश चौधरीचंही कौतुक केलं. 

हेही वाचा : The Kerala Story चित्रपटावरून टीका करणाऱ्यांना अदा शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली 'हा चित्रपट कोणत्याही...'

पुढे शदर पवार म्हणाले, 'शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो. मला फक्त शाहीर साबळे दिसले.' (Ankush Chaudhary) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शरद पवार यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत ते म्हणाले, 'प्रख्यात शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. शाहीरांच्या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहीला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहचविण्याचे महान कार्य शाहीर साबळे यांनी केले. चित्रपट पाहताना त्या कालखंडाची पुन्हा आठवण झाली, याचे अत्यंत समाधान वाटले.'

या चित्रपटातून केदार शिंदे यांच्या मुलीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटातील अभिनयानं सना शिंदेनं सगळ्यांना भूरळ पाडली आहे. भानुमती साबळे ही भूमिका सनानं या चित्रपटात साकारली आहे. चित्रपटात आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरूजी आणि लता मंगेशकर यांची झलकही पाहायला मिळणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल आहेत. तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद हे लेखिका प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.