मुंबई : बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही आपल्या कुटुंबासोबत इटलीमध्ये आहेत. या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता लग्नाशी संबंधित अनेक गोष्टी देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
दीपिका आणि रणवीर भारतात आल्यानंतर मुंबई आणि बंगळुरुमध्ये दोघांचे आई-वडील रिसेप्शन पार्टी देणार आहेत. दोघांचं रिसेप्शन कार्ड देखील अनोखं आहे. या रिसेप्शन कार्डमुळे तोच व्यक्ती या सोहळ्यात शिरकाव करु शकतो ज्याला याचं आमंत्रण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देखील खास पद्धतीने हे रिसेप्शन कार्ड बनवण्यात आलं आहे.
या रिसेप्शन पत्रिकेत एक क्यूआर कोड आहे. यामुळे ज्या व्यक्तीला आमंत्रण आहे तोच व्यक्ती या रिसेप्शनला येऊ शकतो. पाहुण्यांना ई-इनवाईट देखील पाठवण्यात आलं आहे. रिसेप्शनच्या दिवशी पत्रिका आणि ई-इनवाईट क्यूआर कोडने स्कॅन करुनच आत प्रवेश दिला जाणार आहे.
या रिसेप्शन पत्रिकेतील आणखी एक अनोखी गोष्ट म्हणजे. पाहुण्यांना गिफ्ट डोनेट करण्याचं आवाहन दोघांनी केलं आहे. रिसेप्शन कार्डच्या माध्यमातून रणवीर आणि दीपिकाने पाहुण्यांना गिफ्ट दान करण्याचं आवाहन केलं आहे. रणवीर आणि दीपिका एक संस्थेसोबत जोडलेले आहेत.
दीपवीरचं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला मुंबईत तर 21 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये होणार आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती, बॉलिवूड कलाकार आणि इतर क्षेत्रातील पाहुणे हजेरी लावतील.
मागील 5 वर्षापासून दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत होते. पण त्यांना या नंतर हे नातं पुढे नेण्याचं ठरवलं आणि दोघांनी ही लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना एक सुखद धक्का दिला.