मुंबई : चित्रपटासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे असे क्वचितच अभिनेते आहे. जसं आमीर खानने दंगल सिनेमात महावीर सिंह फोगट सारखे दिसण्यासाठी वजन वाढवले होते. त्याचप्रमाणे आता एका अभिनेत्याने एका भूमिकेसाठी आपला जबडा मोडलाय. मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे.
अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) आगामी रॉकेट्री - द नंबी इफेक्ट (Rocketry The Nambi Effects) हा चित्रपट येत आहे. या चित्रपटामुळे आर माधवन चर्चेत आला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्य़े देखील या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले होते. या स्क्रिनिंगद्वारे जगभरात आर माधवनचा डंका गाजला होता.
आर माधवनचा रॉकेट्री - द नंबी इफेक्ट (Rocketry The Nambi Effects) हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात नंबी नारायणनच्या पात्राला न्याय देण्यासाठी माधवनने नुसता रक्त आणि घाम गाळला नाही तर जबडाही मोडला. यासाठी त्याने अनेक वर्षे मेहनत देखील घेतली. आर माधवनने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
मुलाखतीत काय म्हणाला?
एका प्रश्नाच्या उत्तरात माधवन म्हणाला, 'होय, त्याच्यासारखा दिसण्यासाठी मला माझा जबडा तोडावा लागला. त्याला दीड वर्ष लागले. आम्ही प्रथमच खूप काही केले जे यापूर्वी कोणीही केले नव्हते. वेडेपणाची प्रत्येक मर्यादा आम्ही ओलांडली असल्याचे तो या मुलाखतीत म्हणतोय.
'य़ा' तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार
माधवनने रॉकेट्री (Rocketry The Nambi Effects) या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटातून दिग्दर्शनाची जबाबदारीच नाही तर प्रमुख भूमिकेसह अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे केवळ आर माधवनच नाही तर संपूर्ण टीमला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. रॉकेट्री 1 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.