'राझी' तील आलियाच्या फर्स्ट लूक व्हायरल

सोशल मीडियात आलियाचा या सिनेमातील फर्स्ट लूक उघड झाला असून जोरदार व्हायरलही होत आहे. 

Updated: Nov 11, 2017, 06:23 PM IST
'राझी' तील आलियाच्या फर्स्ट लूक व्हायरल  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा आगामी सिनेमा 'राजी' प्रदर्शनाआधी जोरदार चर्चेत आहे. सध्या या सिनेमातील तिच्या लूकचीच सगळीकडे चर्चा आहे. सोशल मीडियात तिचा या सिनेमातील फर्स्ट लूक उघड झाला असून जोरदार व्हायरलही होत आहे. 

विक्की कौशलची एन्ट्री

राजी या सिनेमात आलिया सोबत अभिनेता विक्की कौशल दिसणार आहे. विक्की याआधी 'मसान' आणि 'रमण राघव' या चित्रपटातून सर्वांसमोर आला आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदानही या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.

काय आहे कथा ?

या चित्रपटात एका काश्मिरी मुलीचे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न झाल्यानंतरची कथा दाखविण्यात आली आहे. हरिंदर सिक्का यांच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट मुंबई, काश्मीर आणि पंजाब सारख्या ठिकाणी चित्रित केला आहे.

११ मे ला रिलीज

दिग्दर्शक मेघना गुलझार यांचा हा सिनेमा कधी येणार याविषयी चर्चा रंगली होती. पण आता यावरचा पडदाही उघड झाला आहे. हा सिनेमा  पुढील वर्षात ११ मे रोजी रिलीज होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामूळे आता हा सिनेमा पाहण्यासाठी ६ महिने वाट पाहावी लागणार आहे.