राधे : सलमान खानने तोडली No Kiss पॉलिसी, पु्न्हा एकदा चर्चा

दिशा पाटनीसोबत सलमानचा खास रोमान्स

Updated: Apr 22, 2021, 08:19 PM IST
राधे : सलमान खानने तोडली No Kiss पॉलिसी, पु्न्हा एकदा चर्चा

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' चा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला आहे. परंतु, ट्रेलरमधल्या एकाच सीनवर चाहत्यांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. सलमान खानने या चित्रपटात अभिनेत्री दिशा पाटनीसोबत चक्क किसिंग सीन दिला आहे. सलमानचा किसिंग सीन सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे.

सलमानने सिनेमात किसिंग सीन न देण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे हा सीन पाहून चाहते चकित झाले आहेत. त्यांनी या सीनवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. ट्रेलरमध्ये मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी असलेला राधे म्हणजेच भाईजान सलमान मुंबईतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना दिसणार आहे. दरम्यान सलमान दिशा पटाणीसोबत फ्लर्ट करताना दिसत असून त्याने एक किसिंग सीन शूट केला आहे. ट्रेलरमधील हा सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

एका युझरने प्रतिक्रिया देताना लिहिलं, 'भाईजान तुम्हीदेखील बिघडलात.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'सलमान भाई, तुम्ही तुमच्या चाहत्यांना दिलेलं वचन तोडलं.' एका चाहत्याने लिहिलं, 'आपल्या ३२ वर्षांच्या करिअरमध्ये भाईने पहिल्यांदाच किसिंग सीन दिला.' इतकं असूनही सलमानच्या चाहत्यांनी या ट्रेलरचं स्वागत केलं आहे.

सलमानने काही वर्षांपूर्वी 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली होती तेव्हा त्याला याबद्दल विचारणा करण्यात आली होती. तेव्हा त्याने म्हटलं होतं की, मला वाटतं माझे चित्रपट सगळ्यांना पाहता यावेत. माझ्या बॅनरच्या कोणत्याही चित्रपटात तुम्हाला असे सीन दिसणार नाहीत. माझे चित्रपट कुटुंबाने एकत्र बसून पाहावेत असं वाटतं आणि मोठ्या पडद्यावर किसिंग सीन देण्यात काय मजा आहे.' सलमानचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' १३ मे २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.