Parineeti Chopra and Raghav Chaddha: 13 मे रोजी 'आप'चे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Raghav Chaddha and Parineeti Chopra Engagement) यांचा साखरपुडा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही सगळीकडे जोरात व्हायरल होऊ लागले होते. गेल्या काही दिवसांपासून फक्त त्याच दोघांची चर्चा होती परंतु तुम्हाला माहितीये का की सध्या राघवचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे ज्यात तो आपल्या पहिल्या प्रेमाविषयी चक्क राज्यसभेत बोलताना दिसतो आहे.
यावेळी त्याला राज्यसभेचे सभापती (Raghav Chaddh Parliament Video) चक्क पहिल्या प्रेमाविषयी विचारताना दिसत आहेत ज्यावर राघव लाजत उत्तर देतो. हा व्हिडीओ सगळीकडेच चर्चेत आला आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. (raghav chaddha old vidoe goes viral on instagram as he caught saying about first love)
यावर्षीच्या मार्च महिन्यापासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकमेकांसोबत स्पॉट होताना दिसले. त्यानंतर ते एअरपोर्टवर स्पॉट झाले. एकत्र लंचला गेलेले असतानाही ते दोघं स्पॉट झाले त्याचसोबत आयपीएलच्या एका मॅचदरम्यानही ते दोघं स्पॉट झाले होते. तेव्हा त्या दोघांच्या डेटिंगच्या (Parineeti Chopra and Raghav Chaddha Engagement Photos) चर्चांना कोण उधाण आले होते. परंतु इतक्या चर्चा या सुरू असताना ना परिणीती ना राघव यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कुठलाच खुलासा केला नाही. त्यातून नंतर त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांचा साखरपुडा संपन्न झाला असून ते दोघं एन्गेज्ड आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार असंही कळते की, परिणीती आणि राघव एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते. कारण तो दोघं लंडनमध्ये लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स या महाविद्यालयात शिकले आहेत. राघव आणि परिणीतीचा साखरपुडा झाल्यानंतर परिणीतीचा (Parineeti Chopra Old Video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात परिणीती आपण कधीही कुठल्या राजकारण्याशी लग्न करणार नाही असं म्हणताना दिसते आहे तेव्हा हा व्हिडीओ पाहून अनेक जणं तिला ट्रोलही करताना दिसत आहेत.
हेही वाचा - The Kerala Story ची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई; 12 दिवसात कमावले इतके कोटी रूपये
यावेळी राज्यसभेत बोलताना राज्यसभेचे तत्कालीन सभापती व्यंकय्या नायडू हे राघव चड्ढाला प्रश्न विचारतात की, ''पहिलं प्रेम हे चांगलं असतं ना?'' त्यावर राज्यसभेत सगळेच हसायला लागतात आणि त्यावर राघव चड्ढा उत्तर देतो की, ''माझा यावर काही फारसा अनुभव नाही परंतु पहिलं प्रेम चांगलं असतं.''
त्यानंतर व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) म्हणतात, ''हो पहिलं प्रेम हे चांगलंच असतं आणि आयुष्यभर राहिले पाहिजे.'' तेव्हा राज्यसभेत सगळेच हसू लागतात. हा व्हिडीओ विरल भयानीच्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.