Rahul Vaidya ला जीवे मारण्याची धमकी, मजबुरीत घेतला महत्वाचा निर्णय

गाणं चर्चेत येताच अडचणीत वाढ 

Updated: Oct 16, 2021, 08:39 AM IST
Rahul Vaidya ला जीवे मारण्याची धमकी, मजबुरीत घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई : लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) ला बिग बॉसमधून चांगलीच ओळख मिळाली. हल्लीच त्याच एक गाणं 'गरबे की रात' रिलीज झालं आहे. या गाण्याने प्रेक्षकांचं चांगल मनोरंजन केलंय. मात्र या गाण्यानंतर राहुल वैद्य वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राहुलच्या या गाण्यामुळे त्याला महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

गाण्यामुळे तणावाच वातावरण 

बिग बॉस 14 'फेम राहुल वैद्य कायमच नवीन प्रोजेक्टवर काम करत असतो. अलीकडेच, नवरात्रीच्या निमित्ताने त्यांचे नवीन गाणे 'गरबे की रात' रिलीज झाले आहे. हे गाणे रिलीज होताच हिट देखील झाले आहे. हे गाणे भूमी त्रिवेणीने राहुलसोबत गायले आहे, तर निया शर्मा व्हिडिओमध्ये राहुलसोबत गरबा सादर करताना दिसत आहे. 

एकीकडे लोकांचे पाय या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत, तर दुसरीकडे या गाण्यावरुन वाद सुरु झाला आहे. वाद इतका वाढला आहे की या गाण्यामुळे राहुलला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. तो सतत ट्रोल्सच्या निशाण्याखाली येत असतो. हे प्रकरण पाहता आता राहुलने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा विचार करत आहे. 

'श्री मोगल माँ'चं घेतलं होतं नाव 

राहुल वैद्य यांचे हे गाणे गुजरातमधील आदरणीय देवी 'श्री मोगल माँ' वर आधारित आहे. गुजरातमध्ये त्यांची विशेष ओळख आहे. मोगल माईच्या भक्तांना गाण्यात तिचा उल्लेख आवडत नाही. गाण्यातून मोगल माचा उल्लेख काढून टाकावा अशी त्याची इच्छा आहे. राहुलला गाणे रिलीज झाल्यापासून धमक्या येत आहेत.

गाण्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न 

या प्रकरणावर राहुल म्हणतो की त्याला 'कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती'. फक्त त्यांना काही दिवसांचा वेळ द्या. हे गाणे सुधारण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन बदल केले जातील. '' गरबे की रात 'या गाण्यात निया शर्मा आणि राहुल वैद्य पहिल्यांदा एकत्र दिसले आहेत. दोघांचे हे गाणे रिलीज झाल्यावर, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि लोक त्यावर जोरदार टीका करत आहेत.