''मी तर तिला बहिणीसारखं मानलं होतं, पण तिने तर...''

राज कुंद्रा यांची बहिण रिनाने देखील कविताला सर्व गोष्टीसाठी जबाबदार धरलं आहे.

Updated: Jun 13, 2021, 03:15 PM IST
''मी तर तिला बहिणीसारखं मानलं होतं, पण तिने तर...''

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा कायम त्यांच्या आनंदी जीवनामुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून कुंद्रा कुटुंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.  शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांनी त्यांच्या पहिल्या कुटुंबाबद्दल वक्तव्य केलं. कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांच्यात संबंध होते. असं राज म्हणाले. तर आमच्या घटस्फोटाला फक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी जबाबदार आहे. असं राज यांच्या पहिल्या पत्नीने सांगितलं. आता यावर खुद्द राज कुंद्रा यांच्या बहिण आणि शिल्पा शेट्टीची नणंदने स्पष्टीकरण दिलं आहे. राज कुंद्रा यांची बहिण रिनाने देखील कविताला सर्व गोष्टीसाठी जबाबदार धरलं आहे. 

शिल्पा शेट्टीच्या नणंदने आपल्या पहिल्या वहिनीविषयी बोलताना सांगितलं, 'मी कविताला माझी मोठी बहिण समजत होती. मी तिच्यावर फार प्रेम करायची. मला तिच्यावर विश्वास देखील होता. मी कधी विचार देखील केला नव्हता की ती माझ्यासोबत असं काही करेल...' राज कुंद्रानंतर त्यांच्या बहिणीचं वक्तव्य देखील चर्चेत आहे. 

या मुद्द्यावर शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा म्हणाले 
'मी यावर अनेक वर्षांपासून गप्प आहे. पण आता सगळ्या गोष्टी सांगत असल्यामुळे समाधन वाटत आहे. कारण मी आता सत्य सांगत आहे. माझ्या आईने कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांना अनेकदा नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यांच्यामुळे दोन कुटुंब तुटत होते. त्यांनी कसलाचं विचार केला नाही. '

पुढे कुंद्रा म्हणाले, 'घटस्फोट झाल्यानंतर मी कधीचं कवितासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही. मी माझ्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला. पण कविता आणि तिच्या कुटुंबाने मला माझ्या मुलीला भेटू दिलं नाही. मी फक्त 40 दिवस माझ्या मुलीला पाहिलं आहे. तेव्हा कोर्टाने देखील कविताच्या बाजूने निकाल दिला.'

'मी जेव्हा व्हायरल होत असलेले आर्टिकल पाहिले तेव्हा ते मी शिल्पला पाठवले. शिल्पाने मला यावर काहीही न बोलण्यास सांगितलं. मुख्य म्हणजे शिल्पच्या वाढदिवसाच्या दिवशी  आर्टिकल व्हायरल झाले, त्यामुळे मला धक्का बसला. कविताने फक्त मला फसवलं नाही, तर तिच्यामुळे 2 कुटुंब तुटले आहेत. माझ्या वक्तव्यामुळे शिल्पा नाराज आहे. पण खरं काधीतरी समोर येणार होतं ' असं राज कुंद्रा म्हणाले.