Rajinikanth 74th Birthday: अभिनय विश्वात रजनीकात यांनी स्वतःची अविस्मरणीय छाप सोडली आहे . याशिवाय ते परोपकारी उपक्रम आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे भाग घेत असल्यामळे आफाट फॅन फॉलोविंग बघण्यास मिळते. रजीनकांत यांचा आज 74 वा वाढदिवस असून चाहते देखील त्यांचा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा करत आहेत.
असाच एका चाहत्याचा वीडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्या वायरल वीडियोवर लाइक आणि कमेंट्सचा प्रचंड वर्षाव होत आहेत. या वीडियोमध्ये फॅन दुधाने रजनीकांत यांच्या मुर्तींचं अभिषेक करताना दिसतोय. त्याच्या सोबत घरातील काही सदस्ये सुध्दा आहेत. रजनीकांतच्या इतर चाहत्यांनी हे खूप पसंत केल आहे. या चाहत्याचं नाव कार्तिक आहे. त्याने सुपरस्टार रजनीकांतच मंदिर बांधलय. हे मंदिर कार्तिकने तमिलनाडूमधील मदुरै येथे बांधले आहे. या मंदिराची विशेष बाब म्हणजे, रजनीकांत यांची 250 किलो वजनाची मूर्ति सुध्दा स्थापित केली आहे.
रजनीकांत यांच्यासाठी काहीपण करण्यासाठी त्यांचे चाहते एका पावलावर सज्ज असतात. गेल्या वर्षी हे मंदिर बनवण्याल्याच कार्तिकने खुलासा केला आहे की, रजनीकांत त्यांच्यासाठी देवा समान आहेत. म्हणून त्यांचे मंदिर बनवण्यात आलं आहे. रजनीकांत शिवाय कोणत्याच अभिनेत्याचे चित्रपट कार्तिक व कार्तिकचे कुटुंबिय पाहत नाहीत. गेल्या पाच पिढ्यांपासून कार्तिक व कार्तिकचे कुटूंबीय रजनीकांतचे चाहते आहेत. यावरुन आपण रजनीकांत यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांचा प्रेमाचा आणि जिव्हाळ्यचा अंदाज लाऊ शकतो.
रजनीकांत यांचं खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे. रजनीकांत अभिनयाची सुरुवात वर्ष 1975 मध्ये 'अपूर्व रागंगल' या तमिल सिनेमाद्वरे केली. ही भूमिका बरीचशी लहान असली तरी त्याचा प्रभाव मात्र चाहत्यांवर मोठा पडला होता. रजनीकांत यांना या फिल्म इंडस्ट्रीत 49 वर्षे होत आली आहेत. त्यांनी आत्ता पर्यंत 160 हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यांमधाील अधिकाधिक चित्रपट बहुचर्चीत आणि हिट झालेल्या आहेत. सुपरस्टारच्या नावावर 16 इंडस्ट्री हिट्सचा विक्रम आहे. त्यात15 तमिळ चित्रपट आणि 1 तेलगू चित्रपटाचा समावेश आहे.
1. दरबार
2. काला करीकालन
3. रोबोट
4. बुलंदी
5. अंधा कानून
6.आतंक ही आतंक
7.हम
8. गिरफ्तार
9. कबाली