मुंबईतील 'या' 7 परिसरात राहतात 92 करोडपती? इथं राहत असाल तर स्वतःला श्रीमंत समजा

Most Expensive Areas In Mumbai: मुंबईतील सात महागडे परिसर कोणते? या परिसरात तब्बल 92 करोडपती राहतात. 

वनिता कांबळे | Updated: Dec 12, 2024, 06:16 PM IST
मुंबईतील 'या' 7 परिसरात राहतात 92 करोडपती? इथं राहत असाल तर स्वतःला श्रीमंत समजा

Most Expensive Residential Areas In Mumbai:  मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण जगात मुंबईचा बोलबाला आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे मुंबईत राहतात. साऊथ बॉम्बे येथे अंबानी यांचे अँटिलिया हे निवासस्थान आहे. साऊथ बॉम्बेसह मुंबईत एकून सात महागडे एरिया आहेत. या सात एरियामध्ये एक दोन नाही तर तब्बल 92 करोडपती राहतात.

Add Zee News as a Preferred Source

हे देखील वाचा... महाराष्ट्रात तब्बल 92 हजार एकर जमीन यांच्यानावार? भारतातील तिसरा मोठा जमीनदार

समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मुंबई शहरात उद्योगपती, सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्स स्टार्स यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती राहतात आहे. अब्जाधीशांच्या निवासस्थानाच्या बाबतीत मुंबईने चीनची राजधानी बीजिंगचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. मुंबई शहरात तब्बल 92 करोडपती राहतात. मुंबईतील सात परिसरात हे अब्जाधीश राहतात.

हे देखील वाचा... मुंबईत जमिनीचा एक तुकडा 455 कोटींना विकला; 'या' एरियात झाली ही मोठी, कोण आहे खरेदीदार?

मुंबईच्या दक्षिणेकडील टोकाला असलेला कफ परेड हा एरिया मुंबईतील सर्वात महागडा एरिया आहे. या एरियातच ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निवासस्थान आहे. या भागात महागड्या मालमत्ता आहेत. ताज हॉटेल देखील येथेच आहे.  इथं राहणारे श्रीमंत व्यक्ती नरिमन पॉइंट आणि समुद्र किनाऱ्याचे विहंगम दृष्य अनुभवतात. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हे; दोन नावं ऐकून बसेल धक्का !

वरळी आणि कुलाबा परिसर हे देखील मुंबईतील सर्वात महागडे एरिया आहेत.   वरळीमध्येही उंच इमारती आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत. अनेक क्रिकेटर्सनी वरळीत अलिशान घरे खरेदी केली आहेत. वरळीनंतर कुलाबा देखील मुंबईतील सर्वात हाय प्रोफाईल एरिया आहे. गेटवे ऑफ इंडियाही याच परिसरात आहे. अनेक बडे उद्योगपती या परिसरात राहतात. 

ताडदेवजवळ असलेल्या पेडर रोड परिसरात   भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा 27 मजली अँटिलिया हे निवास स्थान आहे. या परिसरात ब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांचे देखल घर आहे. हे घर जे के हाऊस नावाने ओळखले जाते. 

वांद्रे पश्चिम बॉलीवूड सेलिब्रिटींचे आवडते  ठिकाण आहे. शाहरुख खानच्या  मन्नत बंगला, सलमान खान याचे गॅलेक्सी अपार्टमेंट देखील याच परिसरात आहे. अलीकडेच दक्षिण भारतीय अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने वांद्रे पश्चिम येथील पाली हिल येथे 30 कोटींचा डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला आहे.

मुंबईच्या जुहू परिसरात देखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, हृतिक रोशन आणि अजय देवगण यांचे अलिशान बंगले जुहू परिसरातच आहेत. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More