प्रेमापोटी 25 मुलांचा मार खाल्ला, अभिनेता आज इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक ?

जेवणासाठी पैसे नव्हते आज कोटीच्या संपत्तीचा मालक आहे, कोण आहे 'हा' अभिनेता 

Updated: Aug 31, 2022, 03:11 PM IST
प्रेमापोटी 25 मुलांचा मार खाल्ला, अभिनेता आज इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक ?  title=

मुंबई : बॉलिवू़डविश्वात दररोज अनेक स्टार्सचे वाढदिवस असतात. आज देखील एका अभिनेत्याचा वाढदिवस आहे. बॉलिवू़डमधील सक्सेसफुल अभिनेत्यांमध्ये या अभिनेत्याचे नाव घेतले जाते. या अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी खुपचं वेगळी आहे. एकेकाळी प्रेमासाठी त्याने 25 मुलांचा मार खाल्ला होता, आज लाखो तरूणी त्याच्यावर मरतात. संपत्तीच्या बाबतीतही तो कुठेच कमी नाहीए. कोटीच्या संपत्तीचा तो मालक आहे? कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या.  

बॉलिवू़डमध्ये अनेक दिग्गज अभिनेत आहेत, मात्र या अभिनेत्यांमध्ये जागा न मिळवणार तो कलाकार कसला. असाच बॉलिवू़डचा सक्सेसफुल अभिनेता राजकुमार राव, जो यावर्षी आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची गणना बॉलिवूडमधील यशस्वी स्टार्समध्ये केली जाते. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनेत्याने खुपच मेहनत घेतली होती. 

जेवणासाठी पैसे नव्हते...
आपल्या करिअरच्या संघर्षाबद्दल बोलताना राजकुमार राव एका मुलाखतीत म्हणाला की,  एकदा माझ्याकडे पैसे संपले होते.त्यावेळी माझ्या खात्यात फक्त 18 रुपये आणि माझ्या मित्राच्या खात्यात 27 रुपये शिल्लक होते आणि जेवणासाठी पैसे नव्हते. माझं नशीब होत मी FTII मध्ये आमचे बरेच मित्र होते. त्यामुळे मग आम्ही जेवण करण्यासाठी मित्राच्या ठिकाणी गेलो.कामाची प्रचंड आवड असल्याचेही राजकुमारने नमूद केले. तो दिवसभर ऑडिशन द्यायचा, कधीही थकून, पराभूत होऊन घरी बसायचा नाही पुन्हा मेहनत करायचा.  

संपत्ती किती? 
मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार 44 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तसेच राजकुमार एका चित्रपटासाठी 5-6 कोटी फी घेतात. याशिवाय ब्रँड्स जाहिरातींतून एक कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. राजकुमार रावने आपल्या एका खास मुलाखतीत सांगितले होते की, बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी त्याने अनेक आर्थिक अडचणी पाहिल्या. कुटुंबाला मदत करण्यासाठी लहान वयात तो नृत्य शिकवायचा, त्यासाठी त्याला 300 रुपये मिळायचे.

प्रेमासाठी खाल्ला होता मार 
राजकुमार राव यांनी एकदा त्यांच्या बालपणीच्या प्रेमाबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, 'मी गुडगावमधील मॉडर्न फॅन्सी ब्लू बेल्स स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेलो होतो. त्याच शाळेत मी एक मुलगी बास्केटबॉल खेळताना पाहिली. मग आम्ही दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली पण त्या मुलीचा आधीच एक बॉयफ्रेंड होता. जेव्हा त्या मुलीच्या प्रियकराला समजले की मी तिच्या मैत्रिणीला डेट करत आहे, तेव्हा तो मला मारण्यासाठी 25 जाट मुलांसोबत आला होता. या मुलांकडून मी खुप मार खाल्ला असल्याचे तो सांगतोय.  

दरम्यान राजकुमार राव सध्या नेटफ्लिक्सवरील मोनिका ओ माय डार्लिंग या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा टीझर मंगळवारीच रिलीज झाला होता. राजकुमारच्या या चित्रपटाची फॅन्सना उत्सुकता आहे.