हा आहे जान्हवी कपूरचा फेव्हरिट अॅक्टर

जान्हवी कपूर लवकरच धडक  या सिनेमातून पदार्पण करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरसोबत दिसणार आहे. 

Updated: May 31, 2018, 01:57 PM IST
हा आहे जान्हवी कपूरचा फेव्हरिट अॅक्टर title=

मुंबई : जान्हवी कपूर लवकरच धडक  या सिनेमातून पदार्पण करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरसोबत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन करतेय. नुकतेच जान्हवीने वोग मॅगॅझिनसाठी फोटोशूट केले. तसेच तिने या मॅगॅझिनसाठी पहिला इंटरव्ह्यूही दिला. या इंटरव्ह्यूमध्ये तिने आई श्रीदेवीसोबतच्या अखेरच्या क्षणांच्या आठवणी जागवल्या. तसेच तिचा फेव्हरेट अॅक्टर कोण आहे याची माहितीही दिली. 

जान्हवीने सांगितले तिचा फेव्हरिट अॅक्टर राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि धनुष आहे. हे तीनही अॅक्टर्स आपल्या कामात चांगले आहेत आणि याच कारणामुळे जान्हवीला ते आवडतात. जान्हवी पुढे म्हणाली, या तिघांमध्ये राजकुमार राव सगळ्यात आवडता अॅक्टर आहे. मला माहीत नाही की हे बोलावं की नाही मात्र बरेली की बर्फी पाहिल्यानंतर तो चांगला अॅक्टर असल्याचे मला जाणवले. तो असा एकमेव अॅक्टर आहे ज्याच्यासोबत मी फोटो काढण्यासाठी विचारले होते.

 

Photographed by: @prasadnaaik Styled by: @priyanka86 Hair by: @yiannitsapatori Make-up by: @subbu28

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीच्या आगामी धडक या सिनेमाचे शूटिंग गेल्याच महिन्यात संपलेय. लवकरच ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. धडक हा सिनेमा मराठी सिनेमा सैराटचा रिमेक आहे. हा सिनेमा २० जुलैला रिलीज होणार आहे.